Vazirani Ekonk: येतेय Made In India हायस्पीड Electric स्पोर्ट्स कार; पाहा कधी होणार लाँच आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 01:04 PM2021-10-23T13:04:45+5:302021-10-23T13:05:53+5:30

लवकरच देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपरकार (Electric Supercar) लाँच होणार आहे.

First images of Indias fastest electric car Vazirani Ekonk Unveil on Oct 25 | Vazirani Ekonk: येतेय Made In India हायस्पीड Electric स्पोर्ट्स कार; पाहा कधी होणार लाँच आणि फीचर्स

Vazirani Ekonk: येतेय Made In India हायस्पीड Electric स्पोर्ट्स कार; पाहा कधी होणार लाँच आणि फीचर्स

googlenewsNext
ठळक मुद्देलवकरच देशातील पहिली इलेक्ट्रrक सुपरकार (Electric Supercar) लाँच होणार आहे.

लवकरच देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपरकार (Electric Supercar) लाँच होणार आहे. वझिरानी ऑटोमोटिव्हने 2018 मध्ये गुडवुड फेस्टिव्हल दरम्यान आपलं कॉन्सेप्ट मॉडेल सादर केलं होतं. आता कंपनी भारतातच तयार केलेली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँच करण्यास सज्ज झाली आहे. या कारचं नाव Ekonk असं ठेवण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार कंपनी ही कार 25 ऑक्टोबर रोजी सादर करणार आहे.

मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूर या शहरात NATRAX फॅसिलिटीमध्ये या कारची टेस्टिंग केली जात आहे. तसंच देशातील सर्वात फास्टेस्ट इलेक्ट्रीक कार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. एवढंच नाही तर ही सर्वात हलकी इलेक्ट्रीक कार असल्याचंही सांगण्यात येत आहे. यामुळे या कारचा पिकअपही चांगला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. Ekonk इलेक्ट्रीक कारचं एकूण खर्च 738 किलोग्राम आहे, तर याची इलेक्ट्रीक मोटर 722HP पॉवर जनरेट करते.

काय असेल विशेष?
Ekonk आपल्या विंड चीटिंग एयरोडायनॅमिक्ससोबत उत्तम स्पीड पकडण्यास सक्षम आहे. परंतु ही सिंगल सीटर आहे की दोन लोकांना बसण्याची जागा असेल याबाबत ब्रँडनं याची अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही. दरम्यान, याच्या बाजूला 'EK' मस्कट पाहून अंदाज व्यक्त केलं जाऊ शकतं की ही सिंगल सीटर कार असू शकते.

डिझाईनबाबत सांगायचं झालं तर Vazirani Ekonk काही टीझर इमेजेस जारी केल्या आहेत. यामध्ये फिन्ड टेल लाईट्सही दिसत आहेत. Vazirani Ekonk एक आणि डिझाईन हायलाइट्स त्याचं वेज शेप्ड सिल्हूट असेल. अधिक माहितीसाठी पुढील आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सध्या मेकॅनिझ्म, ड्रायव्हिंग रेंज आणि बॅटरीबाबत अद्यापही कोणती माहिती देण्यात आलेली नाही. 

Web Title: First images of Indias fastest electric car Vazirani Ekonk Unveil on Oct 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.