भट्ट कॅम्प घेऊन येतोयं ‘जलेबी’! पहिल्याच पोस्टरने वाढवली उत्कंठा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 06:00 PM2018-09-03T18:00:31+5:302018-09-03T18:02:44+5:30

निर्माते महेश भट्ट यांच्या आगामी चित्रपटाने सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली आहे, आम्ही ‘सडक2’ बोलतोय, असा तुमचा समज होईल. पण आम्ही बोलतोय ते महेश भट्ट यांच्या ‘जलेबी- द एव्हरलास्टिंग टेस्ट आॅफ लव’ या चित्रपटाबद्दल. 

rhea chakraborty and varun mitra starer mahesh bhatts film jalebi poster out | भट्ट कॅम्प घेऊन येतोयं ‘जलेबी’! पहिल्याच पोस्टरने वाढवली उत्कंठा!

भट्ट कॅम्प घेऊन येतोयं ‘जलेबी’! पहिल्याच पोस्टरने वाढवली उत्कंठा!

googlenewsNext

निर्माते महेश भट्ट यांच्या आगामी चित्रपटाने सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली आहे, आम्ही ‘सडक2’ बोलतोय, असा तुमचा समज होईल. पण आम्ही बोलतोय ते महेश भट्ट यांच्या ‘जलेबी- द एव्हरलास्टिंग टेस्ट आॅफ लव’ या चित्रपटाबद्दल. होय, आज या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाले आणि सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली. महेश भट्ट व मुकेश भट्ट यांच्या विशेष फिल्म्स द्वारा निर्मित हा चित्रपट पुष्पदीप भारद्वाज यांनी दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटात रेहा चक्रवर्ती, दिवांगना सूर्यवंशी आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत आहेत. टेलिव्हिजन अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. ‘कुबुल है’, ‘वीरा’ आणि ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती दिसली आहे. रेहाने ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. ‘दोबारा’, ‘हाफ गर्लफ्रेन्ड’, ‘बँक चोर’ अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. ‘जलेबी’ हा चित्रपट तुम्हाला आयुष्य कसे जगायचे हे शिकवेल, असे हे पोस्टर शेअर करताना महेश भट्ट यांनी लिहिले.




चित्रपटाचे पोस्टर कमालीचे आकर्षक आहे़ ते बघता, पुन्हा एक के्रजी लव्हस्टोरी आपल्याला पाहायला मिळेल, असे दिसतेय.
भट्ट कॅम्पच्या चित्रपटांची गाणी सर्वात वैशिष्ट्यपूर्ण असतात. ‘आशिकी’, ‘आशिकी2’, ‘सडक’, ‘राज’अशा अनेक चित्रपटांची नावे यात घेता येतील. या आगामी चित्रपटाची गाणीही अशीच असणार आहे. करण जोहरने ट्विट करून या चित्रपटांच्या गाण्यांची प्रशंसा केली आहे. मी आत्ताच विशेष फिल्म्सच्या आगामी चित्रपटाची गाणी ऐकली. मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की ती शानदार आहेत, असे ट्विट करणने केले आहे. येत्या १२ आॅक्टोबरला हा चित्रपट रिलीज होतोय.

Web Title: rhea chakraborty and varun mitra starer mahesh bhatts film jalebi poster out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.