-म्हणून ट्विटरने डिलीट केला रजनीकांत यांचा व्हिडीओ, भारतात ट्रेंड झाला #ShameOnTwitterIndia

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 03:01 PM2020-03-22T15:01:37+5:302020-03-22T15:07:19+5:30

चाहत्यांचा संताप अनावर...

coronavirus outbreak rajinikanth support narendra modi on janata curfew and appeal to his fans-ram | -म्हणून ट्विटरने डिलीट केला रजनीकांत यांचा व्हिडीओ, भारतात ट्रेंड झाला #ShameOnTwitterIndia

-म्हणून ट्विटरने डिलीट केला रजनीकांत यांचा व्हिडीओ, भारतात ट्रेंड झाला #ShameOnTwitterIndia

googlenewsNext
ठळक मुद्देरजनीकांत यांचा व्हिडीओ ट्विटरने डिलीट करताच त्यांच्या चाहत्यांचा संताप अनावर झाला.

कोरोना व्हायरसमुळे अख्ख्या जगाला धडकी भरली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी मोदींच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांनीही मोदींच्या या आवाहनाला पाठींबा दर्शवत एक व्हिडीओ पोस्ट केला. मात्र ट्विटर हा व्हिडीओ डिलीट केला.
ट्विटरने रजनीकांत यांचा व्हिडीओ डिलीट केल्याची बातमी पसरायला वेळ लागला नाही आणि क्षणात #ShameOnTwitterIndia हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला.


रजनीकांत यांनी शनिवारी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला होता. या व्हिडीओत त्यांनी जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे तसेच सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत लोकांनी आपआपल्या घरात राहण्याचे आवाहन केले होते. जनता कर्फ्यूचे पालन करून आपण इटलीसारखी स्थिती टाळू शकतो. कोरोनाला तिस-या टप्प्यात जाण्यापासून रोखू शकतो, असेही त्यांनी म्हटले होते. रजनीकांत यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताच तो व्हायरल होऊ लागला. पण काही तासानंतर ट्विटरने हा व्हिडीओ डिलीट केला. रजनीकांत यांच्या व्हिडीओत काही चुकीचे संदर्भ असल्याचा दावा ट्विटरकडून करण्यात आला. कोरोना व्हायरस केवळ 14 तास जिवंत राहू शकतो, असे या व्हिडीओत म्हटले गेले होते. या चुकीच्या संदर्भामुळे ट्विटरने हा व्हिडीओ डिलीट केला.


मात्र रजनीकांत यांचा व्हिडीओ ट्विटरने डिलीट करताच त्यांच्या चाहत्यांचा संताप अनावर झाला. यानंतर #ShameOnTwitterIndia हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला.

 

Web Title: coronavirus outbreak rajinikanth support narendra modi on janata curfew and appeal to his fans-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.