सामान्य समजत असाल बद्धकोष्ठतेची समस्या तर करताय मोठी चूक! होतील 'हे' घातक आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 11:44 AM2021-07-30T11:44:41+5:302021-07-30T11:51:07+5:30

बद्धकोष्ठता (Constipation Home Remedies )त्रास म्हणजे कठीण स्वरुपात शौचास होणे, पोट स्वच्छ न होणे आणि मलत्याग करताना त्रास होणे. हा त्रास होण्यासाठी कोणती कारणे असतात? त्यावर उपाय काय? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

constipation is serious illness, don't ignore, know symptoms, causes and solutions | सामान्य समजत असाल बद्धकोष्ठतेची समस्या तर करताय मोठी चूक! होतील 'हे' घातक आजार

सामान्य समजत असाल बद्धकोष्ठतेची समस्या तर करताय मोठी चूक! होतील 'हे' घातक आजार

Next

निरोगी आरोग्यासाठी ज्याप्रमाणे पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे शरीराची हालचाल होणं देखील गरजेचं आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाण्यासाठी व्यायाम, योगासनं नियमित करणंही आवश्यक आहे. सकस आहाराचा अभाव आणि शरीराची हालचाल न झाल्यानं पोटाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास देखील होऊ शकतो. बद्धकोष्ठता (Constipation Home Remedies )त्रास म्हणजे कठीण स्वरुपात शौचास होणे, पोट स्वच्छ न होणे आणि मलत्याग करताना त्रास होणे. हा त्रास होण्यासाठी कोणती कारणे असतात? त्यावर उपाय काय? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

बद्धकोष्ठतेची कारणे

  • हालचाल कमी असणे
  • पौष्टिक आहाराचा अभाव
  • वजन कमी किंवा जास्त असणे
  • मानसिक विकारांमुळे हा त्रास होऊ शकतो
  • कॅल्शियमयुक्त पदार्थांचे अतिरिक्त सेवन
  • पोटाचे सर्वच विकार
  • शरीरात पाण्याची कमतरता असणे
  • दुधाच्या सेवनाचा अभाव
  • अंमली पदार्थांचे व्यसन
  • अति प्रमाणात चहा आणि कॉफी पिणे
  • बदलती जीवनशैली, बैठ्या स्वरुपातील कामे
  • उच्च रक्तदाब आणि डिप्रेशनवर सुरू असलेल्या औषधोपचारांमुळेही हा त्रास उद्भवू शकतो

 

बद्धकोष्ठता कशी टाळावी

फायबरमुळे पोट स्वच्छ होते
बद्धकोष्ठतेचा त्रास लहानांपासून ते वयोवृद्धांमध्येही आढळतो. हा त्रास कमी करण्यासाठी फायबरयुक्त आहाराचे सेवन करावे.फायबरयुक्त पदार्थांमुळे शरीराची पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. फायबरच्या सेवनामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. यामुळे पचन प्रक्रियेवर कोणताही ताण येत नाही. अन्नपदार्थांचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते.

​जास्त प्रमाणात पाणी प्या
घरामध्ये असताना आपलं पाणी पिण्याचे प्रमाण अतिशय कमी असते. पण ही गोष्ट आरोग्याच्या दृष्टीनं योग्य नाही.दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. घरात असतानाही जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्यामुळे शरीराची झालेली झीज भरून निघते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक लघवी आणि मलाद्वारे बाहेर फेकले जातात.​

अळशीच्या सेवनाने फायदा होतो
अळशीच्या बिया मिक्सरमध्ये वाटून पावडर तयार करून घ्या. अळशीच्या बियांची पावडर पाण्यामध्ये मिक्स करून ठेवा. तीन ते चार तासांना हे पाणी गाळून घ्या आणि प्या. डॉक्टरांकडून अळशीच्या पावडरचे सेवन करण्याचे प्रमाण विचारून घ्या. अळशीच्या बियांमध्ये सॉल्युबल फायबर चे घटक आहेत. बद्धकोष्ठतेच्या त्रासावर अळशीच्या बिया रामबाण उपाय आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट चे प्रमाण कमी असते. ज्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. अळशीमध्ये कित्येक अँटीऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे शरीरातील हार्मोन्स देखील संतुलित राहण्यास मदत होते.

​मधाचे सेवनही फायदेशीर
एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबूचा रस मिक्स करून प्या. मध शरीरासाठी पोषक आहे. बद्धकोष्ठतेच्या त्रासावर मध हा प्रभावी घरगुती उपाय आहे. आयुर्वेदामध्ये मधास अतिशय महत्त्व आहे. कित्येक औषधांमध्ये मधाचा वापर केला जातो. आयुर्वेदामध्ये मधाला संपूर्ण आहाराचा दर्जा देखील देण्यात आला आला आहे. मधामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी - मायक्रोबिअल आणि अँटी - इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

​बद्धकोष्ठतेचा त्रास टाळण्यासाठी करा योग
अश्विनी मुद्रा : योग क्रियेमध्ये अश्विनी मुद्रा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. अश्विनी मुद्रेमुळे हर्निया, गुदद्वारसंबंधीचे आजार, बद्धकोष्ठता इत्यादींचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. अश्विनी मुद्रेमध्ये गुदद्वार आकुंजन करणे आणि त्यानंतर सैल सोडण्याची क्रिया केली जाते. तुम्हाला जमिनीवर किंवा खुर्चीवर बसून ही क्रिया करणे शक्य आहे, त्या पद्धतीनं या योगाभ्यासाचा सराव करावा. पण दोन्ही हात कायम ज्ञान मुद्रेमध्ये असावेत.

Web Title: constipation is serious illness, don't ignore, know symptoms, causes and solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.