विहिरीत आढळला युवतीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 01:42 AM2022-05-18T01:42:43+5:302022-05-18T01:43:16+5:30

घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेल्या युवतीचा दुपारच्या सुमारास पळसे शिवारातील एका विहिरीत मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे

The body of a young woman was found in the well | विहिरीत आढळला युवतीचा मृतदेह

विहिरीत आढळला युवतीचा मृतदेह

Next

नाशिकरोड : घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेल्या युवतीचा दुपारच्या सुमारास पळसे शिवारातील एका विहिरीत मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. गीता वसंत मुंडे (२०, रा. सोमय्यानगर ) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. ती घरातून निघून गेल्यानंतर तिच्या पालकांनी गीताचा सर्वत्र शोध सुरू केला होता. दरम्यान, दुपारच्या सुमारास पळसे येथील शेतकरी पोपट गायधनी यांच्या मळ्यातील विहिरीत गीताचा मृतदेह आढळून आला. तिचे मानसिक स्वास्थ्य चांगले नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The body of a young woman was found in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.