व्हॉट्सॲप, फेसबुक बंद का झाले होते?; सोशल मीडियाला लागला होता मेगा ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 06:51 AM2021-10-06T06:51:49+5:302021-10-06T06:52:09+5:30

बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल अर्थात बीजीपी इंटरनेटवरील सर्व नेटवर्कला एकमेकांना जोडण्याचे काम करत असते.

Why was WhatsApp, Facebook shut down ?; Social media was hit by a mega block | व्हॉट्सॲप, फेसबुक बंद का झाले होते?; सोशल मीडियाला लागला होता मेगा ब्लॉक

व्हॉट्सॲप, फेसबुक बंद का झाले होते?; सोशल मीडियाला लागला होता मेगा ब्लॉक

Next

सोमवारी रात्रीपासून फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम हे तिन्ही सोशल मीडिया जवळपास सहा तास ठप्प होते. अनेकांना आपले व्हॉट्सॲप चालत का नाही, इतरांचे चालते का, असा प्रश्न पडत होता. अनेकांनी एकमेकांना फोन करूनही विचारले. हीच चर्चा इतर सोशल मीडियावरही होती. आता नेमके कारणही पुढे आले आहे... जाणून घेऊ... सोशल मीडियाला हा मेगा ब्लॉक का लागला...

बीजीपी काय असते?
बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल अर्थात बीजीपी इंटरनेटवरील सर्व नेटवर्कला एकमेकांना जोडण्याचे काम करत असते.जेव्हा आपण एखादी वेबसाइट सुरू करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा ती लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी बीजीपीद्वारे त्याचा सर्वांत जवळचा मार्ग शोधला जातो. बीजीपीमध्येच बिघाड झाल्याने फेसबुकच्या सर्व्हरला नेटवर्कचा मार्ग मिळाला नाही आणि त्यामुळे सगळेच ठप्प झाले.

कारण काय?
तज्ज्ञांच्या मते बॉर्डर गेटवे प्रोटोकॉलमुळे (बीजीपी) हा सगळा घोळ झाला.

बिघाड झाला कशामुळे?
काही दिवसांपूर्वी फेसबुकने काही बदल केले होते, त्यामुळे फेसबुकचे डीएनएस सर्व्हरच बंद पडले होते. त्यामुळे ही अडचण आली होती.

Web Title: Why was WhatsApp, Facebook shut down ?; Social media was hit by a mega block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.