बोंबला! पोट साफ करण्यासाठी केला त्याने विचित्र उपाय, पार्श्वभागातून शरीरात सोडला मासा आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 05:32 PM2021-07-28T17:32:45+5:302021-07-28T17:33:57+5:30

चीनमध्ये असं करणं फोक ट्रीटमेंट म्हणजे देशी उपचाराचा भाग आहे. याबाबत मानलं जातं की, 'ईल' मासा मलत्यागाच्या कामात मदत करतो.

Shocking! Man inserts eel fish into rectum from anus in hopes to relief constipation | बोंबला! पोट साफ करण्यासाठी केला त्याने विचित्र उपाय, पार्श्वभागातून शरीरात सोडला मासा आणि मग....

बोंबला! पोट साफ करण्यासाठी केला त्याने विचित्र उपाय, पार्श्वभागातून शरीरात सोडला मासा आणि मग....

Next

अनेकांना पोट ठीकपणे साफ होत नसल्याची तक्रार असते. कारण पोट साफ नसेल तर अनेक प्रकारचे आजार होऊ लागतात. पोट साफ होण्याची वेगवेगळे कारणे असू शकतात. ज्यात बद्धकोष्ठता ही एक समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी लोक नको नको ते करतात. पण आता आम्ही जे तुम्हाला सांगणार आहोत ते वाचून तुम्ही चक्रावून जाल.

या व्यक्तीने बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी मलाशयात एक ईस मास सोडला. ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, चीनच्या जिआंगसू प्रांतातील रहिवाशी व्यक्तीने २० जुलैला हा उपाय केला. त्याने मलाशयाद्वारे शरीरात एक २० सेंटीमीटर लांब ईल मासा सोडला. हा मासा पोटात पोहचल्यावर त्याचा जीव धोक्यात आला होता. (हे पण वाचा : बोंबला! व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये अडकवली अंगठी, काढता काढता फायर फायटरच्या नाकी आले नऊ!)

चीनमध्ये असं करणं फोक ट्रीटमेंट म्हणजे देशी उपचाराचा भाग आहे. याबाबत मानलं जातं की, 'ईल' मासा मलत्यागाच्या कामात मदत करतो. पण या व्यक्तीसोबत असं झालं नाही. स्थानिक उपचार त्याला चांगलाच महागात पडला. कारण बद्धकोष्ठता दूर करण्याऐवजी मासा मलाशयातून निघून कोलन द्वारे पोटात पोहोचला. (हे पण वाचा : महिला बाहेर जाताच तिच्या घरात शिरत होता घरमालक, बेडरूममध्ये जाऊन करत होता हे विचित्र काम....)

पहिल्या दिवशी वेदना असह्य झाल्या त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. पीडित व्यक्तीला डॉक्टरकडे जाण्याची लाज वाटत होती. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरने सांगितलं की, हा उपाय जीवघेणा होता. सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांनुसार, माशामुळे त्याच्या मोठ्या आतड्यांमध्ये बॅक्टेरिया पोहोचला होता. ज्याने त्याला हेमोलिसिस झाला असता. सर्जरी करून ईल मासा काढण्यात आला, तेव्हा मासा जिवंत होता.

स्थानिक मान्यतांनुसार मलाशयात ईल मासा टाकल्याने बद्धकोष्ठतेची समस्या ठीक होते. पण ही काही अशी पहिली घटना नाही. याआधीही गेल्यावर्षी जून २०२०  मध्ये अशीच एक घटना समोर आली होती. तेव्हा दक्षिण चीनच्या Guangdong प्रांतात ५० वर्षीय व्यक्तीने ४० सेंटीमीटर लांब ईलसोबत असा प्रयोग केला होता. तेच दोन जून २०२० ला याच प्रांतात एका तरूणाच्या पोटात आफ्रिकन मासा आढळून आला होता. तेव्हा त्याने दावा केला होता की, तो चुकून माशावर बसला होता.
 

Web Title: Shocking! Man inserts eel fish into rectum from anus in hopes to relief constipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.