Video : तारा सुतारियाची विमानात उडाली घाबरगुंडी, हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 07:40 PM2019-04-30T19:40:00+5:302019-04-30T19:40:00+5:30

अभिनेत्री तारा सुतारियाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती विमानात बसली असून तिची घाबरगुंडी उडालेली दिसते.

Video: student of the year 2 actress tara sutaria got scared of air turbulence prayed in flight for safety | Video : तारा सुतारियाची विमानात उडाली घाबरगुंडी, हा घ्या पुरावा

Video : तारा सुतारियाची विमानात उडाली घाबरगुंडी, हा घ्या पुरावा

googlenewsNext

'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील कलाकार सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतेच टायगर श्रॉफ, अनन्या पांडे व तारा सुतारिया चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गुजरातला रवाना झाले. त्यावेळी विमानातील प्रवासादरम्यानचा अनुभव तारासाठी खूप भीतीदायक होता. तिचा हा व्हिडिओ धर्मा मुव्हिजच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओत तारा सुतारिया विमानात डोळे बंद करून आणि हात जोडून प्रार्थना करताना दिसणार आहे. तिच्या चेहऱ्यावर भीती पहायला मिळते. जेव्हा ती डोळे उघडत नव्हती तेव्हा कॅमेरा तिच्या बाजूला बसलेली अनन्या पांडेकडे जातो आहे. तारा सांगते की, 'तिला एअर टर्ब्युलेन्सची भीती वाटते. म्हणून ती प्रार्थना करते.'


तिची हालत पाहून अंदाज लावू शकतो की विमान अहमदाबादमध्ये सुरक्षितरित्या लँड झाल्यावर तिच्या जीवात जीव आला असेल. विमानात ताराची घाबरगुंडी जरी उडाली असली तरी काही तासांनंतर प्रमोशनच्यावेळी तिच्या चेहऱ्यावर अजिबात भीती वगैरे दिसत नाही.


'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटात तारा सुतारिया व अनन्या पांडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

या चित्रपटात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Video: student of the year 2 actress tara sutaria got scared of air turbulence prayed in flight for safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.