ओडिशातील वाळू शिल्प महोत्सवात सिंधुदुर्गच्या सुपुत्राचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 06:38 PM2021-12-04T18:38:30+5:302021-12-04T18:39:16+5:30

रविराज चिपकर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये वाळू शिल्पकार म्हणून चिपकर प्रसिद्ध आहेत.

Raviraj Chipkar a sand sculptor from Sindhudurg, participates in the International Sand Sculpture Festival in Odisha | ओडिशातील वाळू शिल्प महोत्सवात सिंधुदुर्गच्या सुपुत्राचा सहभाग

ओडिशातील वाळू शिल्प महोत्सवात सिंधुदुर्गच्या सुपुत्राचा सहभाग

googlenewsNext

वेंगुर्ला : ओडिशा येथील ‘आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प महोत्सवात‘ सिंधुदुर्गच्या सुपुत्राने सहभाग घेतला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील सोन्सुरे येथील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी या महोत्सवात सुंदर अशी शिल्पकला साकारली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये वाळू शिल्पकार म्हणून चिपकर प्रसिद्ध आहेत. या आंतरराष्ट्रीय महोत्सवात चिपकर यांनी साकारलेल्या शिल्पकलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, नुकतेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. त्यावेळी रविराज चिपकर यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना समुद्रकिनारी वाळू शिल्पातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती. त्या वेळीही त्यांच्या कलेचे सर्वत्र कौतुक झाले होते.

Web Title: Raviraj Chipkar a sand sculptor from Sindhudurg, participates in the International Sand Sculpture Festival in Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.