कामगाराची नजर चुकवून चोरले ३५ हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट; १५ दिवसानंतर आले निदर्शनास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 10:55 AM2021-11-23T10:55:47+5:302021-11-23T10:55:53+5:30

महिलेने पाडव्याच्या दिवशी गर्दीत दुकानात जाऊन सोन्याचे ब्रेसलेट घेण्याचा बहाणा केला

35,000 gold bracelets stolen from women shopkeeper It was observed after 15 days | कामगाराची नजर चुकवून चोरले ३५ हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट; १५ दिवसानंतर आले निदर्शनास

कामगाराची नजर चुकवून चोरले ३५ हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट; १५ दिवसानंतर आले निदर्शनास

Next

चाकण : ग्राहक म्हणून सोन्याच्या दुकानात आलेल्या महिलेने दुकानातील कामगाराची नजर चुकवून ३५ हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेले असल्याची घटना माणिक चौक, चाकण येथे अंबिका ज्वेलर्स येथे घडली. सुशील रामनिवास वर्मा ( रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्मा यांचे चाकण येथे अंबिका ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान आहे. मागील पंधरवड्यात ५ नोव्हेंबर रोजी ऐन दिवाळी पाडव्याच्या दिवशी गर्दीत दुपारी चार वाजताच्या सुमारास एक महिला या दुकानात आली. तिने सोन्याचे ब्रेसलेट घेण्याचा बहाणा केला. दुकानातील कामगाराची नजर चुकवून ३५ हजारांचे ब्रेसलेट पाहण्यासाठी हातात घेऊन ते हातचलाखीने पर्समध्ये ठेऊन चोरून नेले. काही दिवसानंतर हा प्रकार निदर्शनास आल्याने १५ दिवसानंतर चाकण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: 35,000 gold bracelets stolen from women shopkeeper It was observed after 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.