अभिनेत्रीसोबतच उत्कृष्ट गायिका आहे ऐश्वर्या राय, हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 06:22 PM2020-02-04T18:22:35+5:302020-02-04T19:53:26+5:30

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या मेरी साँसो में बसा है हे गाणे गाताना दिसत आहे.

Did you know Aishwarya Rai Bachchan is an amazing singer? | अभिनेत्रीसोबतच उत्कृष्ट गायिका आहे ऐश्वर्या राय, हा घ्या पुरावा

अभिनेत्रीसोबतच उत्कृष्ट गायिका आहे ऐश्वर्या राय, हा घ्या पुरावा

googlenewsNext
ठळक मुद्देऐश्वर्याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी भरभरून कमेंट्स दिल्या आहेत. अनेकांनी ऐश्वर्यात असलेल्या सिंगिंग टॅलेंटचेही कौतुक केले आहे. ऐश्वर्या तू एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगली गायिका देखील आहेस असे तिचे चाहते तिला कमेंटद्वारे सांगत आहेत. 

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या चाहत्यांची संख्या कमी नाहीये. ऐश सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसली तरी तिचे फोटो आणि व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. सध्या ऐश्वर्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या तिच्या और प्यार हो गया या चित्रपटातील मेरी साँसो में बसा है हे गाणे गाताना दिसत आहे.

ऐश्वर्याच्या या व्हिडिओत आपल्याला तिच्यासोबत अभिनेता चंद्रचूड सिंगही दिसतोय. ‘मेरी साँसो में बसा है’ हे गाणे ऐश्वर्याच्याच ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातील आहे. याच चित्रपटातून ऐश्वर्याचा डेब्यू केला होता. त्यामुळे हा चित्रपट तिच्यासाठी खूप खास आहे. 1997 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात ऐश्वर्या आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला होता. पण त्याचसोबत या चित्रपटातील गाण्यांची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. मेरी साँसो में बसा है हे गाणे तर रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ऐश्वर्याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी भरभरून कमेंट्स दिल्या आहेत. अनेकांनी ऐश्वर्यात असलेल्या सिंगिंग टॅलेंटचेही कौतुक केले आहे. ऐश्वर्या तू एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगली गायिका देखील आहेस असे तिचे चाहते तिला कमेंटद्वारे सांगत आहेत. 

बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या ऐश्वर्याने 2011 मध्ये गर्भवती असल्यामुळे चित्रपटांमधून ब्रेक घेतला. नंतर 2015 मध्ये संजय गुप्ताच्या ‘जज्बा’ या चित्रपटाद्वारे तिने कमबॅक केला होता. पुढच्याच वर्षी ‘ऐ दिल है मुश्किल’ मध्ये ती झळकली होती. सध्या ती मणिरत्नम यांच्या एका तामीळ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. 

Web Title: Did you know Aishwarya Rai Bachchan is an amazing singer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.