OMG! हार्ट अटॅक आलेल्या रूग्णावर उपचार करतानाच डॉक्टरचा कार्डियक अरेस्टने मृत्यू आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 12:12 PM2021-11-29T12:12:48+5:302021-11-29T12:14:44+5:30

रूग्णावर उपचार करत असताना डॉक्टरलाच कार्डियक अरेस्ट आला आणि लगेच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरचं वय ४० होतं तर त्यांचं नाव डॉक्टर लक्ष्मण होतं.

Telangana : Doctor dies of cardiac arrest while reviving a heart patient | OMG! हार्ट अटॅक आलेल्या रूग्णावर उपचार करतानाच डॉक्टरचा कार्डियक अरेस्टने मृत्यू आणि मग....

OMG! हार्ट अटॅक आलेल्या रूग्णावर उपचार करतानाच डॉक्टरचा कार्डियक अरेस्टने मृत्यू आणि मग....

Next

तेलंगानामध्ये (Telangana) एका डॉक्टरचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू झाला.  मीडिया रिपोर्टनुसार, डॉक्टरचा मृत्यू त्यावेळी झाला, ज्यावेळी डॉक्टर एका हार्ट अटॅक आलेल्या रूग्णावर उपचार कररत होते. रूग्णावर उपचार करत असताना डॉक्टरलाच कार्डियक अरेस्ट आला आणि लगेच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरचं वय ४० होतं तर त्यांचं नाव डॉक्टर लक्ष्मण होतं.

कामारेड्डी जिल्ह्यातील गांधारी मंडलमधील एका नर्सिंग होममध्ये काम करणारे ४० वर्षीय डॉक्टर लक्ष्मण यांना कार्डियक अरेस्ट आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्युवेळी ते एका कार्डियक अरेस्ट आलेल्या रूग्णावर उपचार करत होते. मात्र, थोड्या वेळातच म्हणजे आधी डॉक्टर आणि नंतर रूग्णाने हॉस्पिटलमध्येच अखेरचा श्वास घेतला

६० वर्षीय जगैया नाइकला रविवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टर लक्ष्मण यांनी इतर स्टाफसोबत आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू केले होते. उपचार सुरू असताना अचानक डॉक्टर लक्ष्मण खाली पडले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते वाचू शकले नाहीत.

नाइक यांची स्थिती अधिक बिघडल्याने त्यांनी लगेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर कऱण्यात आलं. जिथे त्यांचं निधन झालं. डॉक्टर लक्ष्मण एक लोकप्रिय चिकित्सक होते आणि त्यांच्या अशा जाण्याने स्थानिकांना धक्का बसला आहे. 
 

Web Title: Telangana : Doctor dies of cardiac arrest while reviving a heart patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.