कपलचा 'कबीर सिंग' स्टाईल बाईक रोमान्सचा VIDEO व्हायरल; असलं धाडस करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 09:29 AM2021-09-08T09:29:01+5:302021-09-08T09:30:29+5:30

प्रेमात माणसाची काहीही करण्याची तयारी असते. पण प्रेमात नसतं धाडस करणं कितपत योग्य आहे हे जाणत्या तरुणाईनं ठरवायला नको का?

Couples bike romance video on Bhopals VIP road viral | कपलचा 'कबीर सिंग' स्टाईल बाईक रोमान्सचा VIDEO व्हायरल; असलं धाडस करू नका!

कपलचा 'कबीर सिंग' स्टाईल बाईक रोमान्सचा VIDEO व्हायरल; असलं धाडस करू नका!

Next

प्रेमात माणसाची काहीही करण्याची तयारी असते. पण प्रेमात नसतं धाडस करणं कितपत योग्य आहे हे जाणत्या तरुणाईनं ठरवायला नको का? असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण तसाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्ही याला खरंच प्रेम म्हणायचं की आणखी काय ते ठरवा. भोपाळच्या व्हीआयपी रोडवर धावत्या बाईकवर प्रेमी युगुलाचं रोमान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. १३ सेकंदाच्या या व्हिडिओत धावत्या बाईकवर तरुणी थेट बाईकच्या टाकीवर बसून चालक तरुणाला मिठी मारुन बसल्याचं दिसून येत आहे. याच रस्त्यावर जाणाऱ्या एका कार चालकानं या संपूर्ण घटनेचं व्हिडिओ चित्रीकरण केलं आहे.

आपल्या नसत्या धाडसाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जातोय हे कळताच तरुणानं बाईकचा वेग वाढवून तिथून पळ काढला. व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होताच पोलिसांनीही याची दखल घेतली. पोलिसांनी व्हिडिओची माहिती घेत संबंधित रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजचा वापर करुन बाईकच्या नंबर प्लेटवरुन तरुणाचा शोध घेण्यात येत आहे. 

उत्तर विभागाचे एसपी विजय खत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुणाचा शोध घेण्यात येत असून मोटार व्हेइकल अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात येईल. स्वत:चा जीव धोक्यात घालून अशापद्धतीनं वाहन चालवणं स्वत:सह इतरांसाठी जीवघेणं ठरतं, असं खत्री यांनी म्हटलं आहे. अशापद्धतीचे जीवघेणे स्टंट करणाऱ्यांविरोधात अनेकदा कारवाई करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं. कारवाया करुनही तरुणाईचे हे असले जीवघेणे स्टंट थांबत नाहीत हे दुर्दैव असल्याचंही खत्री म्हणाले. 

Read in English

Web Title: Couples bike romance video on Bhopals VIP road viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.