सरस्वतीच्या दर्शनासाठी गेलेल्या अकाेल्यातील दाेन युवकांचा तेलंगणातील नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 08:32 PM2022-05-14T20:32:41+5:302022-05-14T20:32:48+5:30

Two Youth Drowned in Godawari River in Telangana : भाैरद येथील प्रतीक महेश गावंडे (२२) व जुने शहरातील बाळापूर राेड परिसरातील भारती प्लाॅटमधील किरण चंद्रशेखर लटकुटे (२२) या दाेन युवकांचा समावेश आहे.

Two youths from Akola who went to visit Saraswati drowned in a river in Telangana | सरस्वतीच्या दर्शनासाठी गेलेल्या अकाेल्यातील दाेन युवकांचा तेलंगणातील नदीत बुडून मृत्यू

सरस्वतीच्या दर्शनासाठी गेलेल्या अकाेल्यातील दाेन युवकांचा तेलंगणातील नदीत बुडून मृत्यू

Next

अकाेला: तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या बासर येथे सरस्वतीच्या दर्शनासाठी गेलेल्या अकाेल्यातील दाेन युवकांचा गाेदावरी नदीत बुडून मुत्यू झाल्याची घटना १४ मे राेजी घडली. यामध्ये शहरालगतच्या भाैरद येथील प्रतीक महेश गावंडे (२२) व जुने शहरातील बाळापूर राेड परिसरातील भारती प्लाॅटमधील किरण चंद्रशेखर लटकुटे (२२) या दाेन युवकांचा समावेश आहे.

महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या बासर येथील सरस्वतीच्या दर्शनासाठी जुने शहरातील ११ युवक १३ मे राेजी रवाना झाले हाेते. शनिवारी सकाळी ते अंघाेळीसाठी गाेदावरी नदीत उतरले. यावेळी किरण लटकुटे व प्रतीक गावंडे यांना खाेल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडाले. त्यांच्यासाेबत असलेल्या इतर मित्रांनी आरडाओरडा केल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी पाण्यात उतरुन दाेघांचा शाेध घेतला. यादरम्यान, दाेघांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने प्रतीक व किरण यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भायनसा येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले. घटनेची माहिती मिळताच दाेन्ही मृतकांच्या कुटुंबीयांनी बासर येथे धाव घेतली. शनिवारी सायंकाळी दाेघांचे शवविच्छेदन झाल्यामुळे त्यांचे मृतदेह घेउन कुटुंबीय अकाेल्याकडे मार्गस्थ झाल्याची माहिती आहे. प्रतीक गावंडे व किरण लटकुटे परिवारात एकुलता एक असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Two youths from Akola who went to visit Saraswati drowned in a river in Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.