Avani Lekhara: सोनेरी यश मिळवणाऱ्या अवनीवर बक्षिसांचा वर्षाव, आनंद महिंद्रा देणार खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 12:37 PM2021-08-30T12:37:59+5:302021-08-30T12:47:03+5:30

Tokyo Paralympics, Avani Lekhara News: अवनी लेखरा हिने महिलांच्या दहा मीटर एअर रायफलच्या क्लास एसएच नेमबाजीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली.

Avani Lekhara: Anand Mahindra to give special gift to Avani who Won gold Medal in Tokyo Paralympics | Avani Lekhara: सोनेरी यश मिळवणाऱ्या अवनीवर बक्षिसांचा वर्षाव, आनंद महिंद्रा देणार खास गिफ्ट

Avani Lekhara: सोनेरी यश मिळवणाऱ्या अवनीवर बक्षिसांचा वर्षाव, आनंद महिंद्रा देणार खास गिफ्ट

googlenewsNext

टोकियो - टोकियोमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारतीय अॅथलिटकडून पदकांची लयलूट सुरू आहे. आज सकाळी अवनी लेखरा हिने महिलांच्या दहा मीटर एअर रायफलच्या क्लास एसएच नेमबाजीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. (Tokyo Paralympics)अंतिम फेरीत तिने २४९.६ गुण मिळवत  तिने जागतिक विक्रमाची बरोबरी करत अव्वलस्थान पटकावले. (Avani Lekhara) पात्रता फेरीत सातव्या स्थानावर राहिलेल्या अवनीने अंतिम फेरीत मात्र जोरदार कामगिरी केली आणि सुवर्णवेध घेतला. या स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. दरम्यान, हे सुवर्णपदक जिंकल्यानंतर अवनीवर कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव होऊ लागला आहे. (Anand Mahindra to give special gift to Avani who Won gold Medal in Tokyo Paralympics)

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही अवनीच्या या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून अवनीला स्पेशल गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. 

आनंद महिंद्रा आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, आम्ही दिव्यांगांसाठी एसयूव्ही विकसित करावी, असा सल्ला काही दिवसांपूर्वी दीपा मलिक हिने दिला होता. मी माझे सहकारी वेलू यांना या आव्हानाचा सामना करण्यासाठी विनंती केली आहे. वेलू हे आमचे डेव्हलपमेंट हेड आहेत. असो वेलूजी तुमच्याकडून विकसित झालेली अशी पहिली एसयूव्ही #AvaniLekhara हिला समर्पित करून भेट देऊ इच्छितो.

ऑलिम्पिक असो वा पॅरालिम्पिक या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी अवनी ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे. तत्पूर्वी पी.व्ही. सिंधू आणि मीराबाई चानू यांनी ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या गटात रौप्यपदके जिंकली होती. तसेच पॅरालिम्पिकध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची चौथी खेळाडू आहे. या स्पर्धेत मुरलीकांत पेटकर यांनी १९७२ मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्यानंतर देवेंद्र झाझरियाने भारतासाठी दुसरे आणि तिसरे पदक जिंकले. तर चौथे पदक मरियप्पन थंगावेलू याने जिंकले होते.

Web Title: Avani Lekhara: Anand Mahindra to give special gift to Avani who Won gold Medal in Tokyo Paralympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.