जागतिक मौखिक स्वच्छता दिनानिमित्त जनजागृती, तपासणी सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:27 AM2021-08-01T04:27:42+5:302021-08-01T04:27:42+5:30

यानिमित्त १ ते ७ ऑगस्ट दरम्यान जागतिक मौखिक स्वच्छता दिनानिमित्त रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर तसेच इतरांना माहिती देणे, शासकीय निमशासकीय ...

World Oral Hygiene Day Awareness Week | जागतिक मौखिक स्वच्छता दिनानिमित्त जनजागृती, तपासणी सप्ताह

जागतिक मौखिक स्वच्छता दिनानिमित्त जनजागृती, तपासणी सप्ताह

Next

यानिमित्त १ ते ७ ऑगस्ट दरम्यान जागतिक मौखिक स्वच्छता दिनानिमित्त रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर तसेच इतरांना माहिती देणे, शासकीय निमशासकीय कार्यालयात जनजागृती करणे, अधिकारी, कर्मचाऱ्यांची मौखिक तपासणी करणे, जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना मौखिक आरोग्यविषयक प्रशिक्षण देणे, मौखिक आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, मनोरुग्णालये, सुधारणागृहे आदी ठिकाणी मौखिक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठीची जबाबदारीही विविध वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान, हे कार्यक्रम आयोजित करताना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही डॉ. सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.

गतवर्षी १५२२ रुग्णांची तपासणी

येथील जिल्हा रुग्णालयातील ओरल व मॅक्झिलो फेशियल सर्जरी विभागात वर्षभरात १ हजार ५२२ रुग्णांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी १५ जणांना मौखिक रोग असल्याचे स्पष्ट झाले होते, तसेच १५ जणांची बायोस्कॉपी करण्यात आली होती. योग्य उपचार मिळाल्याने सर्व रुग्ण बरे झाल्याची माहिती क्रेनिओ मॅक्झिलो फेशियल सर्जन डॉ. फैसल सलिम खान यांनी दिली.

Web Title: World Oral Hygiene Day Awareness Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.