सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा डेब्यू ठरला! या रिमेकमधून घेणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 01:41 PM2018-11-15T13:41:24+5:302018-11-15T13:44:10+5:30

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी याच्या बॉलिवूड डेब्यूचा मुहूर्त अखेर ठरलाय. होय, अहान शेट्टी दीर्घकाळापासून या डेब्यूसाठी तयारी करत होता. आज त्याच्या डेब्यूची अधिकृत घोषणा करण्यात आली.

suniel shettys son ahan shetty to make bollywood debut in milan luthrias next |  सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा डेब्यू ठरला! या रिमेकमधून घेणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री!!

 सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा डेब्यू ठरला! या रिमेकमधून घेणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री!!

googlenewsNext
ठळक मुद्देनिर्माता साजिद नाडियादवाला अहानला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे.तूर्तास अहान शेट्टी त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहेत. अहान हा कथितरित्या तानिया श्रॉफला डेट करतोय.

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी याच्या बॉलिवूड डेब्यूचा मुहूर्त अखेर ठरलाय. होय, अहान शेट्टी दीर्घकाळापासून या डेब्यूसाठी तयारी करत होता. आज त्याच्या डेब्यूची अधिकृत घोषणा करण्यात आली. ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श याने ट्विटरवर अहानच्या डेब्यूवर शिक्कामोर्तब केले.  'IT'S OFFICIAL... Sajid Nadiadwala ropes in director Milan Luthria for Ahan Shetty’s debut... An official remake of #Telugu hit #RX100.'असे ट्विट त्याने केले. त्याच्या या ट्विटसोबतचं अहान ‘आरएक्स 100’ मधून डेब्यू करणार, हे निश्चित झाले.




निर्माता साजिद नाडियादवाला अहानला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. ‘आरएक्स 100’ हा एका तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रिमेक आहे. यात अहान मुख्य भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शन मिलन लुथरिया हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.  मिलन लुथरियाने आत्तापर्यंत ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘बादशाहो’ यांसारख्या चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
तूर्तास अहान शेट्टी त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहेत. अहान हा कथितरित्या तानिया श्रॉफला डेट करतोय. दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. सुनील शेट्टी यांनीही तानिया ही अहानची गर्लफ्रेन्ड असल्याची कबुली दिली आहे.
अहानच्या आधी त्याची बहीण अथिया शेट्टी हिने २०१५ मध्ये बॉलिवूड डेब्यू केला होता. सलमान खान निर्मित ‘हिरो’मधून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. या चित्रपटात अथिया सूरज पांचोलीसोबत दिसली होती. पण हा चित्रपट दणकून आपटला होता. अथिया व सूरजची जोडी प्रेक्षकांना आवडली नव्हती. अथियानंतर अहान आपल्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. आता त्याचा डेब्यू किती यशस्वी होतो, ते बघूच.

Web Title: suniel shettys son ahan shetty to make bollywood debut in milan luthrias next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.