तुला पाहते रे फेम गायत्री दातारचे नववधूच्या वेषातील फोटो झालेत व्हायरल, अडकली का ती लग्नबंधनात?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 07:52 PM2020-03-06T19:52:44+5:302020-03-06T19:53:50+5:30

या फोटोत गायत्रीने खूप छान लेहेंगा घातला असून खूप सारे दागिने परिधान केले आहेत.

tula pahate re fame gayatri datar do photo shooot in bride costume PSC | तुला पाहते रे फेम गायत्री दातारचे नववधूच्या वेषातील फोटो झालेत व्हायरल, अडकली का ती लग्नबंधनात?

तुला पाहते रे फेम गायत्री दातारचे नववधूच्या वेषातील फोटो झालेत व्हायरल, अडकली का ती लग्नबंधनात?

googlenewsNext
ठळक मुद्देगायत्रीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये गायत्री नववधूच्या रूपात दिसत असून तिने लग्न केले का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला आहे. पण गायत्रीने लग्न केलेले नसून हा लूक तिचा एका जाहिरातीतील आहे.

तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. साधी, सोज्वळ ईशा अरूण निमकर आणि सरंजामे कंपनीचे प्रमुख विक्रांत सरंजामे यांच्या प्रेमकथेने रसिकांना भुरळ पाडली होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीदेखील या मालिकेतील कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.

तुला पाहते रे’ या मालिकेत ईशाच्या भूमिकेत असलेली गायत्री दातार सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून नेहमीच अपडेट देत असते. नुकताच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

गायत्रीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये गायत्री नववधूच्या रूपात दिसत असून तिने लग्न केले का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला आहे. पण गायत्रीने लग्न केलेले नसून हा लूक तिचा एका जाहिरातीतील आहे. तेजाज्ञा या ब्रँडसाठी गायत्रीने फोटोशूट केले असून यातील काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

गायत्रीने शेअर केलेल्या या फोटोत तिने खूप छान लेहेंगा घातला असून खूप सारे दागिने परिधान केले आहेत. तसेच तिने गॉगलदेखील घातला आहे. तू खूप गोड दिसत असून हा चष्मा तुला शोभून दिसत आहे असे तिला तिचे चाहते सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत तर काहीजण तुझा फोटो पाहून तू लग्न करतेस असेच आम्हाला वाटले होते असे सांगत आहेत. 

‘तुला पाहते रे’ या मालिकेने निरोप घेतल्यानंतर गायत्रीने निम्मा शिम्मा राक्षस या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकात ती शहजादीच्या भूमिकेत दिसली. याशिवाय ती कोल्हापूर डायरिज चित्रपटात झळकणार आहे.

Web Title: tula pahate re fame gayatri datar do photo shooot in bride costume PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.