मोठी बातमी; पंढरपुरात फर्निचरच्या दुकानाला आग ; कोट्यावधी रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 08:11 AM2021-10-20T08:11:04+5:302021-10-20T08:11:34+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; Fire at a furniture shop in Pandharpur; Loss of crores of rupees | मोठी बातमी; पंढरपुरात फर्निचरच्या दुकानाला आग ; कोट्यावधी रुपयांचे नुकसान

मोठी बातमी; पंढरपुरात फर्निचरच्या दुकानाला आग ; कोट्यावधी रुपयांचे नुकसान

Next

पंढरपूर : शहरातील एका फर्निचरला अचानक आग लागून १ कोटी ९३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना लिंकरोड परिसरात रात्री पावणे एकच्या सुमारास घडली आहे. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, शहरातील लिंकरोडजवळील महालक्ष्मी फर्निचर दुकानाला अज्ञात कारणाने आग लागली. या आगीने काहीच वेळात भीषण रुप धारण केले. यामुळे दुकानातील टिव्ही, फ्रिज, फॅन, सोपा, खुर्च्या, टेबल, बेड यासह अन्य इलेक्ट्रीक व फर्निचरचे साहीत्य आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आग लागल्याची माहीती मिळताच उपविभागीय पोलीस अधिक्षक विक्रम कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. व्ही. केंद्रे, राजेंद्र मगदुम, निलेश बागव, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, आकाश भिगांरदेवे, मुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, अग्निशामक अधिकारी बाळासाहेब कांबळे, नगरसेवक गुरुदास अभयंकर यांनी घटनास्थळी पोहचून नागरीकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.

आग विझवण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या अग्निशमकाच्या १८ ते २० खेपाद्वारे ही आग विझवण्याचा प्रयत्न झाला परंतु फर्निचर मॉलचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने व या चारी बाजूंनी आग लागली. यामुळे सांगोला नगरपरिषदेच्या अग्निशामकच्या ५, मंगळवेढा ५, पांडुरंग साखर कारखानाच्या अग्निशामक ४ पाण्याचा खेपा द्वारे आग विझवण्यात आली. या आगीमध्ये अंदाजे १ कोटी ९३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहीती दुकानाचे मालक राजेंद्र दोशी यांनी पोलीसांना दिली आहे. पुढील तपास सपोनि. सी. व्ही. केंद्रे करीत आहेत.

 दोन वर्षापुर्वी घडली होती दुख:त घटना...

महालक्ष्मी फर्निचरचे मालक राजेंद्र दोशी यांचा मुलगा सागर दोशी (वय ३१) हे १४ जानेवारी २०२० रोजी सोलापूरहून पंढरपूरकडे येताना कार पलटी झाली होती. या अपघातात सागर यांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर मंगळवारी फर्निचरच्या दुकानाला आग लागून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Big news; Fire at a furniture shop in Pandharpur; Loss of crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.