मोदींचा बर्थडे... 21 दिवस साजरा होणार, 7 ऑक्टोबरपर्यंत कार्यक्रमातून लोकसेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 11:06 AM2021-09-17T11:06:00+5:302021-09-17T11:13:29+5:30

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून ते गावागावातील कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

Modi's birthday will be celebrated for 21 days till October 7 | मोदींचा बर्थडे... 21 दिवस साजरा होणार, 7 ऑक्टोबरपर्यंत कार्यक्रमातून लोकसेवा

मोदींचा बर्थडे... 21 दिवस साजरा होणार, 7 ऑक्टोबरपर्यंत कार्यक्रमातून लोकसेवा

Next
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आणि कार्याची माहिती देणाऱ्या सेमिनार्सचं आयोजन करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 71 वा वाढदिवस देशभरात साजरा होत आहे. देशातील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे भाजपकडून आजपासून 3 आठवडे म्हणजेच 7 ऑक्टोबरपर्यंत वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामुळे, मोदींच्या वाढदिवसाचे 21 दिवस सेलिब्रेशन होत असल्याचे दिसून येते. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून ते गावागावातील कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरात 7 ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. या कालावधीमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकार आणि पक्षासंदर्भात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण बदलण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. 

मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या 21 दिवसीय कार्यक्रमामध्ये 14 कोटी रेशनच्या पिशव्या, 5 कोटी थँक यू मोदीजी पोस्ट कार्ड, नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत 71 जागांवर केलं जाणार काम, सोशल मीडियावरील कॅम्पेनसोबतच करोना लसीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आणि कार्याची माहिती देणाऱ्या सेमिनार्सचं आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, भाजपाकडून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेला गती देण्याचं कामही या 21 दिवसात होईल.  
 

Web Title: Modi's birthday will be celebrated for 21 days till October 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.