यांची मस्ती उतरवावीच लागेल...! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला ‘मनसे’ दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 02:01 PM2020-03-03T14:01:17+5:302020-03-03T14:04:05+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Serial : हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता!!!

taarak mehta ka ooltah chashmah champak lal solve the problem of mother togue in gokuldham mns leader ameya khopkar criticized-ram | यांची मस्ती उतरवावीच लागेल...! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला ‘मनसे’ दणका

यांची मस्ती उतरवावीच लागेल...! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला ‘मनसे’ दणका

googlenewsNext
ठळक मुद्देअमेय खोपकर यांच्या या पोस्टवर युजर्सनीही प्रतिक्रिया दिल्या असून काही युजर्सनी ज्याने हे उद्गार काढले त्याने माफी मागावी अशा आशयाची मागणी केली आहे.

गोकुलधाम सोसायटीतील किस्से संपता संपत नाहीत. नुकतेच गोकुलधाम सोसायटीतील सदस्य आपआपल्या मातृभाषेवर अडून बसलेले दिसले. आम्ही बोलतोय ते ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेबद्दल. मालिकेच्या ताज्या एपिसोडमध्ये गोकुलधामचे सदस्य मातृभाषेवरून एकमेकांशी भिडताना दिसले. अर्थात हा राडा वाढण्याआधी बापूजी चंपक लाल यांनी मध्यस्थी केली आणि मातृभाषेवरून सुरु झालेला गोकुलधाममधला राडा थांबवला. मालिकेतला राडा थांबला असला तरी बाहेर मात्र यावरून एक दुसरा ‘राडा’ सुरु झाला आहे. होय, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मालिकेच्या या एपिसोड तीव्र संताप व्यक्त केला आहे.
‘आपले गोकुलधाम कुठे आहे, मुंबईत आणि मुंबईची भाषा काय आहे? हिंदी,’ असा एक संवाद बापूजी चंपक लाल या एपिसोडमध्ये म्हणताना दिसतात. अमेय खोपकर यांनी नेमक्या याच संवादावर आक्षेप घेत, ‘हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता,’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. यांची मस्ती उतरवावीच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


मनसेचा विरोध याच नीच वृत्तीला आहे. मुंबईची भाषा मराठी हे यांना व्यवस्थित माहिती आहे, तरीही मालिकांमधून असा पद्धतशीर अपप्रचार सुरु असतो. यांची मस्ती उतरवावीच लागेल. या गुजराथी किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणा-या मराठी कलाकारांनाही यात काही चूक वाटत नाही, याचीच शरम वाटते,’असेही  अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

अमेय खोपकर यांच्या या पोस्टवर युजर्सनीही प्रतिक्रिया दिल्या असून काही युजर्सनी ज्याने हे उद्गार काढले त्याने माफी मागावी अशा आशयाची मागणी केली आहे.

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah champak lal solve the problem of mother togue in gokuldham mns leader ameya khopkar criticized-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.