तीनशे किमी उलटपायी प्रवास !

By Admin | Published: January 17, 2017 10:53 PM2017-01-17T22:53:46+5:302017-01-17T22:55:17+5:30

तामलवाडी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पुणे-पंढरपूर-तुळजापूर असा जळपास ३०० किमीचा उलटपायी प्रवास फुरसुंगी (पुणे) गावातील बापुराव उर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड (वय-५०) यांनी पूर्ण केला

Traveling for three hundred kilometers! | तीनशे किमी उलटपायी प्रवास !

तीनशे किमी उलटपायी प्रवास !

googlenewsNext

तामलवाडी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पुणे-पंढरपूर-तुळजापूर असा जळपास ३०० किमीचा उलटपायी प्रवास फुरसुंगी (पुणे) गावातील बापुराव उर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड (वय-५०) यांनी पूर्ण केला. त्यांचा मंगळवारी तामलवाडी, सांगवी (काटी), सुरतगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बापुराव गुंड यांनी ६ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ९.३० वाजता श्री संत दगडूशेठ हलवाई गणपतीचे व माता तांबडी जोगेश्वरीचा आशिर्वाद घेवून पंढरीच्या विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेतले. आणि मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे, यासाठी साकडे घालून उलटपायी प्रवास सुरू केला. त्यांनी घातलेल्या शर्टवर अन्याय, अत्याचार थांबवावेत, रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, पोलिसांवरील हल्ले थांबवावेत अशा विविध मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सुमारे तीनशे किमीचा प्रवास करून मंगळवारी सकाळी ९ वाजता गुंड तामलवाडी येथे दाखल झाले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे सुरतगाव, सांगवी (काटी) येथेही पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी शंकरराव मगर, मधुकर मगर, साधू शिंदे, अमर मगर, महादेव माळी, शंकर माने, श्रीकांत वडणे, आप्पाराव मगर, रामदास मगर, अंकुश मगर, जमीर शेख, दस्तगीर शेख, सुरतगाव, उपसरपंच, विठ्ठल गुंड, देवराज मित्रमंडळाचे आण्णासाहेब गुंड यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: Traveling for three hundred kilometers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.