गॅस गळतीमुळे टपरीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 12:11 AM2021-11-09T00:11:48+5:302021-11-09T00:13:56+5:30

देवळा : शहरातील मालेगाव नाक्यावरील पाणीपुरी आणि भेळ बनविणाऱ्या टपरीमधील सिलिंडरच्या नळीमधून गॅसगळती झाल्याने टपरीने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी (दि.८) दुपारच्या सुमारास घडली.

Tapari fire due to gas leak | गॅस गळतीमुळे टपरीला आग

जि.प. विद्यानिकेतनसमोर पेटलेली हातगाडी.

Next
ठळक मुद्देआगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण गाडी जळून खाक

देवळा : शहरातील मालेगाव नाक्यावरील पाणीपुरी आणि भेळ बनविणाऱ्या टपरीमधील सिलिंडरच्या नळीमधून गॅसगळती झाल्याने टपरीने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी (दि.८) दुपारच्या सुमारास घडली. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून, काही नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, गाडी मालक श्रवण रामेश्वर साळवे याने पळ काढल्याने याच्या हाताला किरकोळ भाजले असून, त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, पोलीस नाईक रामदास गवळी, अरुण अहिरे, प्रकाश सोनवणे, संदीप चौधरी तसेच गॅस एजन्सीचे कर्मचारी आदींनी घटनास्थळी धाव घेत अग्निरोधक आणि पाण्याच्या साहाय्याने आग विझविली.

कारवाईची मागणी
या घटनेमुळे शहरात चौकाचौकात थाटण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गाड्यांवर सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना न करता सर्रास सिलिंडरचा वापर केला जात असून, नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस विभागाने अशा हातगाड्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

 

Web Title: Tapari fire due to gas leak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.