सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, पार्थ पवारांचाही शायरीतून निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 11:48 AM2021-10-14T11:48:11+5:302021-10-14T11:48:53+5:30

पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी केला आहे.

My aim is not just to create a season, nawab malik and Partha Pawar target bjp through poetry | सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, पार्थ पवारांचाही शायरीतून निशाणा

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, पार्थ पवारांचाही शायरीतून निशाणा

Next
ठळक मुद्देपिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी केला आहे.

मुंबई - आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आप्तेंष्टांवर धाडी टाकल्यानंतर पवार कुटुंबीयांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. तर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक हे सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत. आता, अजित पवार यांचे सुपुत्र आणि युवक नेते पार्थ पवार यांनीही ट्विटरवरुन भाजपला इशारा दिला. त्यानंतर, शायरीतून आपलं मतही व्यक्त केलंय. 

पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी केला आहे. 'सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आम्ही मुळापर्यंत जाणार, हीच का स्मार्ट सिटी? असा सवाल पार्थ पवार यांनी विचारला आहे. त्यानंतर, पार्थ यांनी शायरी ट्विट करुन पुन्हा एकदा मेसेज दिला आहे. 


“सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।”

अशी शायरी पार्थ यांनी ट्विट केली आहे. विशेष म्हणजे नवाब मलिक यांनीही शायरी ट्विट करुन भाजपवर निशाणा साधला आहे. 

मुख़ालिफ़त से मेरी शख़्सियत और निखरती है,
मैं अपने दुशमनों का बड़ा एहतराम करता हूँ।


दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या बहिण म्हणजे पार्थ यांच्या आत्यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यामुळे, पवार कुटुंबातील सर्वच सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.  

काय म्हणाले होते शरद पवार 

उत्तर प्रदेशच्या घटनेला जालियनवाला बाग म्हटल्याने आमच्या घरावर छापे टाकण्यात येत आहेत. या केंद्राच्या दबावाला जरा सुध्दा भीक घालणार नाही, त्यांना काय करायचे आहे ते करू द्या असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला. तसेच, या छाप्यांवरून शरद पवारांनी सोलापुरात तुफान बॅटिंग केली होती. अजित पवारांच्या घरी पाहुणे येऊन गेले. पण पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबात वाटत नाही, असाही टोला पवारांनी लगावला होता.
 

Web Title: My aim is not just to create a season, nawab malik and Partha Pawar target bjp through poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.