अर्जुन तेंडुलकरची मैत्रिण; विराटने ९ वर्षांपूर्वी जिचं मन दुखवलं, तिने काल समलैंगिक जोडीदारासोबत लग्न केलं

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनिएल वॅटने ( Danni Wyatt) गुरुवारी सोशल मीडियावरून लग्नाची घोषणा केली.

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनिएल वॅटने ( Danni Wyatt) गुरुवारी सोशल मीडियावरून लग्नाची घोषणा केली. काही वर्षांपूर्वी तिने विराट कोहली ( Virat Kohli) लग्नासाठी मागणी घातली होती आणि तेव्हा त्याची बरीच चर्चा झाली होती.

अर्जुन तेंडुलकरसोबत इंग्लंडच्या वॅटचे अनेक फोटोही समोर आले होते. दोघेही एकत्र सराव करताना दिसले. ३१ वर्षीय डॅनिएल वॅटने अलीकडेच महिला प्रीमिअर लीगच्या लिलावात नाव नोंदवले होते, परंतु कोणत्याही संघाने तिला आपल्या ताफ्यात घेतले नाही.

डॅनिएल वॅटने गर्लफ्रेंड जॉर्जी हॉजसोबत साखरपुडा केला आणि हॉज ही महिला फुटबॉल संघाच्या व्यवस्थापक आहेत. दोघीही खेळाशी संबंधित आहेत. डॅनिएलने गुरुवारी सर्वांना आपल्या साखरपुड्याबाबत जाहीर केले. तिने सोशल मीडियावर फोटोही शेअर केला आहे. यामध्ये ती अंगठी दाखवताना दिसत आहे.

२०१४ मध्ये वॅटने सोशल मीडियावर लिहिले होते, कोहली माझ्याशी लग्न कर... अशी पोस्ट लिहिली होती. आता ९ वर्षांनंतर वॅटने लग्न केले. तिचा आणि कोहलीचा एकत्र फोटोही व्हायरल झाला होता. विराट कोहलीने २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले.

डॅनिएल वॅटनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ शतके झळकावली आहेत. तिन २०१० मध्ये वन डे आणि ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिने १०२ वन डे सामन्यांत १७७६ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतकं व ५ अर्धशतकांचा समावेश आहे. १२९ धावा ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे.

डॅनिएल वॅटने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १४३ सामन्यांमध्ये २ शतकं व ११ अरधशतकांच्या मदतीने २३६९ धावा केल्या. १२४ ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे.