पाहा धर्मेंद्र यांच्या मुलीचा फोटो, पहिल्यांदाच आला मीडियासमोर, दिसते अतिशय सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 01:02 PM2020-02-17T13:02:09+5:302020-02-17T13:03:11+5:30

बॉबीने इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर अजिताचा फोटो पोस्ट केला आहे.

BOBBY DEOL SHARED SISTER AJITA'S IMAGE | पाहा धर्मेंद्र यांच्या मुलीचा फोटो, पहिल्यांदाच आला मीडियासमोर, दिसते अतिशय सुंदर

पाहा धर्मेंद्र यांच्या मुलीचा फोटो, पहिल्यांदाच आला मीडियासमोर, दिसते अतिशय सुंदर

googlenewsNext
ठळक मुद्देअजिता ही दिसायला खूपच सुंदर असून ती गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहाते. तिची दोन्ही भावंडं, वडील हे प्रसिद्ध अभिनेते असले तरी ती कॅमेऱ्यापासून नेहमीच दूर राहाते.

बॉलिवूडमधील अतिशय महान अभिनेत्यांमध्ये धर्मेंद्र यांची गणना केली जाते. धर्मेंद्र यांचे फॅन फॉलॉविंग प्रचंड आहे. सगळ्याच वयोगटातील लोक त्यांचे चाहते असून त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. धर्मेंद्र एक चांगले अभिनेते असण्यासोबतच एक खूप चांगले व्यक्ती आहेत. त्यांच्या डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्त्वाचे नेहमीच कौतुक केले जाते.

धर्मेंद्र यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्यांचे खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले. धर्मेंद्र केवळ 19 वर्षांचे असताना त्यांचे लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झाले होते. त्या दोघांना सनी, बॉबी, अजिता, विजेता अशी चार मुले आहेत. अजिता आणि विजेता या नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहाणेच पसंत करतात. त्या दोघी कशा दिसतात याविषयी खूपच कमी जणांना माहिती आहे. बॉबीने इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर अजिताचा फोटो पोस्ट केला आहे. अजिता ही दिसायला खूपच सुंदर असून ती गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहाते. तिची दोन्ही भावंडं, वडील हे प्रसिद्ध अभिनेते असले तरी ती कॅमेऱ्यापासून नेहमीच दूर राहाते. 

धर्मेंद्र यांनी दिग्दर्शक अर्जुन हिंगोरानी यांच्या १९६० मधील ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी बॉयफ्रेंड या चित्रपटात साहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. बंदिनी या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यांनी शोले, चुपके चुपके, धर्मवीर, आई मिलन की बेला, फूल और पत्थर, मेरा गाव मेरा देश, यादों की बारात यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांचा संसार अतिशय आनंदात सुरू असताना 1975 मध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या अफेअरची चर्चा मीडियात रंगली आणि काहीच वर्षांत त्यांनी लग्न केले. त्यांना इशा आणि आहाना अशा दोन मुली आहेत. 

Web Title: BOBBY DEOL SHARED SISTER AJITA'S IMAGE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.