बॉलिवूडच्या या 9 दिग्गजांची पहिली कमाई माहित आहे का ?
By Admin | Published: September 29, 2016 08:42 PM2016-09-29T20:42:01+5:302016-09-29T20:42:01+5:30
महानायक अमिताभ बच्चन, देसी गर्ल प्रियंका चोप्रा, ही मॅन धर्मेंद्र असे अनेक कलाकार आहेत ज्यांची कमाई खुपच कमी होती. तुम्हाला त्यावर विश्वासच बसणार नाही
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 : आयुष्यातील पहिली कमाई कधी कुणीही विसरु शकत नाही. पहिली सॅलरी हातात घेतानाचा क्षण प्रत्येकासाठी अविस्मरणीय असतो. हा खास क्षण बॉलिवूड सेलिब्रिटींच्याही आठवणीतील ठेवा बनला आहे. आज कोटींची कमाई करणा-या बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांची पहिली कमाईसुद्धा हजारांमध्येच होती. काहींची तर अगदीच कमी होती.
आज बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खानच्या पहिल्या कमाईचा आकडा किती होता, हे तुम्हाला ठाऊक आहे का? शाहरुखची पहिली कमाई ही केवळ 50 रुपये होती. जाणून आश्चर्यचकित झालात ना....शाहरुख प्रमाणेच महानायक अमिताभ बच्चन, देसी गर्ल प्रियंका चोप्रा, ही मॅन धर्मेंद्र असे अनेक कलाकार आहेत ज्यांची कमाई खुपच कमी होती. तुम्हाला त्यावर विश्वासच बसणार नाही. तर जाणून घ्या बॉलिवूड वर राज्य करणाऱ्या काही दिग्गज कलाकांराची पहिली कमाई.
1) अमिताभ बच्चन - 500 रुपये
2) रोहित शेट्टी - 35 रुपये
3) धर्मेंद्र - 51रुपये
4 ) शाहरुख खान - 50रुपये
5 ) आमिर खान - 1000रुपये
6) ह्रतिक रोशन - 100 रुपये
7) प्रियंका चोप्रा - 5000 रुपये
8) नसीरुद्दीन शहा - 7.5 रुपये
9) मनोज वाजपेयी - 120 रुपये