Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार ०६९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ४३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 11:09 PM2021-10-12T23:09:49+5:302021-10-12T23:10:04+5:30

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३६ टक्के आहे. 

Coronavirus In Maharashtra: 2 thousand 069 new coronavirus patients registered in the last 24 hours in the maharashtra; 43 death | Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार ०६९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ४३ जणांचा मृत्यू

Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार ०६९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ४३ जणांचा मृत्यू

googlenewsNext

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ०६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात ३६१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३६ टक्के आहे. 

राज्यात सध्या ३० हजार ५२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात २,३१,००९ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर १३३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०४,२०,५१५  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,81, 677 (10.89टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासात ४२५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ७,२४,८२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ५०९८ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर ११५४ दिवसांवर गेला आहे.

Web Title: Coronavirus In Maharashtra: 2 thousand 069 new coronavirus patients registered in the last 24 hours in the maharashtra; 43 death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.