Crime News: माडखोलची महिला, बांद्याचा तरुण, गोव्यात खून... 'गुगल पे'मुळे सापडला आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 09:03 PM2022-05-17T21:03:45+5:302022-05-17T21:05:32+5:30

Crime News: गोव्यातील हरमल मधील एका गेस्ट हाऊसमध्ये सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील एका ३० वर्षीय महिलेवर  विषप्रयोग करून निर्दयपणे खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

Crime News: Madkhol woman, Banda youth, murder in Goa ... Accused found due to 'Google Pay' | Crime News: माडखोलची महिला, बांद्याचा तरुण, गोव्यात खून... 'गुगल पे'मुळे सापडला आरोपी

Crime News: माडखोलची महिला, बांद्याचा तरुण, गोव्यात खून... 'गुगल पे'मुळे सापडला आरोपी

Next

सावंतवाडी /पणजी: गोव्यातील हरमल मधील एका गेस्ट हाऊसमध्ये सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील एका ३० वर्षीय महिलेवर  विषप्रयोग करून निर्दयपणे खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. हा प्रकार ९ ते १३ मे दरम्यान घडला असल्याचा पोलीसांना संशय असून याप्रकरणी पोलिसांनी बांदा येथील गणेश विर्नोडकर (२५) याला ताब्यात घेतले आहे. प्रेम प्रकरणातून हा खुनाचा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त आहे. 
सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील महिला ही आठवड्यापूर्वी हरमलक मधील त्या गेस्ट हाऊस वर उतरली होती.तिच्या सोबत बांदा येथील गणेश विर्नोडकर हा युवक होता तो तेथेच कामाला असतो.या महिलेने या गेस्ट हाऊस मध्ये ओळखपत्र ही दिले होते.मात्र सोमवारी 16  मे ला या गेस्ट हाऊस च्या  बंद खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने रुमबॉयने व्यवस्थापकास सांगितले.

गेस्ट हाऊस च्या मालकाने रूमची पाहाणी केली असता रूम मधून च दुर्गंधी येत असल्याने व रूम ला कुलूप असल्याने पोलीसांना घटनास्थळी बोलवण्यात आले पोलीस दाखल होत रूमचा दरवाजा उघडून पाहाणी केली एका महिलेचा मृतदेह आढळून आला.मृतदेहा शेजारी काहि बाटल्या पडल्याने तिने विष घेतले असल्याचे भासवण्यात आले.पण पोलिसांकडून सर्व घटनेची माहिती घेतली तसेच तिच्या सोबत असलेला युवक कोण याबाबत कसून तपास करण्यात आला.

त्यावेळी हा मुलगा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले त्यानंतर त्यालाही गोवा पोलीसांनी बांदा येथून ताब्यात घेतले.ही महिला संशयित गणेशच्या मित्राची बायको असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले तसेच हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचा संशय ही पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

त्यांच्यात नेमके काय घडले ह्याचा शोध चालू आहे. पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांनी गतीने  तपास करीत संशयिताला ताब्यात घेतले असून त्याला मंगळवारी सायंकाळी उशिरा गोव्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.अधिक तपास गोवा पेडणे पोलीस करीत आहे.
 
‘गुगल पे’ने शोध 
महिलेसोबतच्या युवकाने आपले ओळखपत्र दिले नव्हते. तो युवक १३ मे रोजी रात्री दरवाजाला कुलूप लावून निघून गेल्याचे सीसीटीव्हीत दिसल्याचे व्यवस्थापकाने सांगितले. संशयिताने ‘गुगल पे’च्या सहाय्याने गेस्ट हाऊसच्या मॅनेजरला रुमचे भाडे दिले होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने यंत्रणा गतिमान केली. आणि संशयित गणेशला ताब्यात घेतले.

Web Title: Crime News: Madkhol woman, Banda youth, murder in Goa ... Accused found due to 'Google Pay'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.