डोक्यात कु-हाड मारुन पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:15 AM2018-12-13T00:15:28+5:302018-12-13T00:15:47+5:30

फर्दापुरातील घटना : दोन जणांना अटक

 Wife's blood with a bone in his head | डोक्यात कु-हाड मारुन पत्नीचा खून

डोक्यात कु-हाड मारुन पत्नीचा खून

googlenewsNext

फर्दापूर : पतीने डोक्यात कु-हाड मारल्याने जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली.
फर्दापूर येथील शफीक नब्बास तडवी (३०) याने ६ डिसेंबर रोजी रागाच्या भरात पत्नी आशा (२७) हिच्या डोक्यात कुºहाड मारली होती. यानंतर आशाला जखमी अवस्थेत जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला औरंगाबाद येथे हलविण्यात आले. ९ डिसेंबर रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आशाच्या आईने फर्दापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरुन पोलिसांनी तपास करुन आरोपी शफीक व त्याची आई हासाबाई नब्बास तडवी यांना अटक केली. मयत आशाच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. ही बालके आईच्या प्रेमाला मुकली आहेत. पोलिसांनी कुºहाड जप्त केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली फर्दापूरचे पोलीस निरीक्षक शरद जºहाड, सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे, कर्मचारी ज्ञानेश्वर सरताळे, सुनील भिवसने, दिलीप पवार, खांडे, धनवट, मनिष गिरी, सचिन केंद्रे हे करीत आहेत.

Web Title:  Wife's blood with a bone in his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.