Coronavirus : बाधितांना रुग्णालयात सोडणाऱ्या बसच्या निर्जंतुकीकरणाकडे दुर्लक्ष, चालक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 10:41 AM2020-07-16T10:41:58+5:302020-07-16T10:42:36+5:30

चालकांनी मनपाच्या कार्यालयासमोर एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला.

Coronavirus: Driver angry over disinfection of city bus | Coronavirus : बाधितांना रुग्णालयात सोडणाऱ्या बसच्या निर्जंतुकीकरणाकडे दुर्लक्ष, चालक संतप्त

Coronavirus : बाधितांना रुग्णालयात सोडणाऱ्या बसच्या निर्जंतुकीकरणाकडे दुर्लक्ष, चालक संतप्त

googlenewsNext
ठळक मुद्देबसचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी कर्मचारी अपुरे आहेत.

औरंगाबाद : सिटी बसमधून पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालय आणि मनपाच्या केंद्रांत दाखल केले जाते. रूग्ण सोडल्यानंतर बसचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने चालकांनी मनपाच्या कार्यालयासमोर एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला.

पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर बसचे निर्जंतुकीकरण केले पाहिजे. परंतु ते न करताच अहवाल निगेटिव्ह आलेल्या रुग्णांना घरी सोडण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे निगेटिव्ह रुग्णांसह आमच्याही आरोग्याशी खेळले जात असल्याचे चालकांनी म्हटले. बसचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी कर्मचारी अपुरे आहेत. त्यातून हा प्रकार होत आहे. याविषयी मनपाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत चालकांनी आपले म्हणणे मांडले.

Web Title: Coronavirus: Driver angry over disinfection of city bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.