पतीनं घरात गुपचूप कोब्रा आणला, त्याला भडकवलं; डमी टेस्टनं खुनाचं रहस्य उलगडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 12:33 PM2021-08-27T12:33:28+5:302021-08-27T12:38:20+5:30

पोलिसांनुसार, सूरजने लपून एक कोब्रा साप खरेदी करून आणला होता. ज्याचा वापर त्याने उथराचा जीव घेण्यासाठी केला होता.

केरळ पोलिसांनी हत्याकांडाची केस सॉल्व्ह करण्यासाठी अनोखी डमी टेस्ट केली. उथरा हत्याकांडाचा तपास करणाऱ्या टीमने गुरूवारी एक साप आणि महिलेच्या पुतळ्याचा सीन रिक्रिएट केला. टीमने तज्ज्ञांसोबत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, सापाने जर नॉर्मल दंश मारला असता तर त्याचा निशाण कसा असला असता आणि सापाला दंश मारण्यासाठी भाग पाडलं तर दंशाचा निशाण कसा होईल.

गेल्यावर्षी ७ मे रोजी उथरा नावाच्या महिलेचा आपल्या पतीच्या घरात सापाने दंश मारल्याने मृत्यू झाला होता होता. आता तपासादरम्यान असं समोर आलं की, महिलेचा पती सूरजने मुद्दामहून सापाला तिला दंश मारण्यास भाग पाडलं.

पोलिसांनुसार, सूरजने लपून एक कोब्रा साप खरेदी करून आणला होता. ज्याचा वापर त्याने उथराचा जीव घेण्यासाठी केला होता. सूरजने दोन साप खरेदी केले होते. त्यातील एक कोब्रा होता. गेल्यावर्षी करण्यात आलेल्या डमी प्रयोगात तपासा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अनेक गोष्टींचं विश्लेषण केलं.

या प्रयोगादरम्यान आधी तर सापाला डमी महिलेच्या अंगावर पाडण्यात आलं. अनेकदा डमीवर सापाला पाडण्यात आल्यावरही त्याने डमीला दंश केला नाही.

मग दुसरा प्रयोग हा होता की, सापाच्या तोंडाजवळ डमीचा हात घेऊन जायचा आणि सापाला भडकवायचं. या प्रयोगातही सापाने डमीला दंश मारला नाही. त्यामुळे पोलीस अधिकारीही हैराण झाले.

तिसऱ्या प्रयोगात सापाच्या शरीरावर प्रहार करण्यासाठी डमीच्या हाताचा वापर करण्यात आला. या प्रयोगात पोलिसांना हवा तो परिणाम मिळाला. डमीच्या हाताला सापाने दंश मारला.

शेवटच्या प्रयोगात सापाला हाताने पकडून डमीवर जबरदस्ती दंश मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या टेस्टच्या विश्लेषणातून सापाच्या दंशाच्या आकड्यांमध्ये बराच फरक समोर आला. शरीरावर प्रहार केल्यावर सापाने जेव्हा दंश मारला, तेव्हा चावण्याचा निशा १.७ सेमी रूंद होता.

तेच जेव्हा सापाला हातात धरून डमीला दंश मारण्यासाठी भडकवण्यात आलं तेव्हा निशाण २ सेमी ते २.४ सेमी होता. टीमचं असं मत आहे की, तपासादरम्यान हे महत्वपूर्ण ठरेल. असं म्हटलं जातं की, ही डमी टेस्ट गेल्यावर्षी जुलै-ऑगस्ट दरम्यान झाली होती. ही टेस्ट वन विभागाच्या अरिप्पा परीक्षण केंद्राने आयोजित केली होती.