Xiaomi Phones: काही मिनिटांत चार्ज होणारा भन्नाट फोन येतोय देशात; जानेवारीमध्ये होऊ शकतो लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: November 30, 2021 05:38 PM2021-11-30T17:38:48+5:302021-11-30T17:40:15+5:30

Xiaomi Fast Charging Phones: Xiaomi देखील आपला 120W फास्ट चार्जिंग असलेला फोन सादर करून या शर्यतीत सहभागी होणार आहे. म्हणजे Xiaomi 11T Pro किंवा Redmi Note 11 Pro+ यातील एक फोन भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो.

Xiaomi to launch 120w fast charge smartphone in india soon  | Xiaomi Phones: काही मिनिटांत चार्ज होणारा भन्नाट फोन येतोय देशात; जानेवारीमध्ये होऊ शकतो लाँच 

Xiaomi Phones: काही मिनिटांत चार्ज होणारा भन्नाट फोन येतोय देशात; जानेवारीमध्ये होऊ शकतो लाँच 

Next

2022 हे वर्ष जागतिक तसेच भारतीय टेक स्मार्टफोन विश्वासाठी महत्वाचं ठरणार आहे. कंपन्या आपल्या स्मार्टफोनच्या चार्जिंगचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढवणार असल्याचं दिसत आहे. यात Realme, Vivo, OPPO आणि OnePlus चा समावेश असेल. बीबीके इलेक्ट्रॉनिकचे हे ब्रँड भारतात लवकरच 100W पेक्षा जास्त फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारे स्मार्टफोन लाँच करणार आहेत. इथे Xiaomi देखील आपला 120W फास्ट चार्जिंग असलेला फोन सादर करून या शर्यतीत सहभागी होणार आहे.  

91 मोबाईल्सने दिलेल्या बातमीनुसार शाओमी लवकरच भारतात 120W फास्ट चार्जिंग असलेला स्मार्टफोन लाँच करू शकते. असे दोन फोन जागतिक बाजारात कंपनीनं याआधी सादर केले आहेत. म्हणजे Xiaomi 11T Pro किंवा Redmi Note 11 Pro+ यातील एक फोन भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, हा फोन भारतात Redmi Note 11i Hypercharge नावाने सादर केला जाईल.  

Redmi Note 11i Hypercharge भारतात कधी सादर केला जाईल हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे. परंतु 91mobiles ने हा फोन जानेवारीच्या आसपास येईल, असा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Xiaomi 11T Pro स्मार्टफोनची बॅटरी BIS सर्टिफिकेशन्सवर मॉडेल नंबर BM58 सह स्पॉट केली गेली होती. त्यामुळं 120W फास्ट चार्जिंग असलेला हा स्मार्टफोन Xiaomi 11T Pro असू शकतो, असं सांगण्यात आलं आहे.  

Xiaomi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स     

Xiaomi 11T Pro फोनमध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. शाओमी 11T मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 20:9 अस्पेक्ट रेश्यो, 480Hz टच रिस्पॉन्स रेट, डॉल्बी विजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस लेयरसह 6.67-इंचाचा FHD+ TrueColor डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते आहे.      

या फोनची खासियत म्हणजे या फोनचा चार्जिंग स्पीड. Xiaomi 11T Pro मधील 5000mAh ची बॅटरी 120W इतक्या जबरदस्त वेगाने चार्ज करता येते. हा फोन फक्त 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो. बेस मॉडेलप्रमाणे या फोन मध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 108MP चा सॅमसंग HM2 मुख्य सेन्सर, 8MP ची 119-डिग्री अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 3x झूमसह 8MP टेलीमॅक्रो सेन्सर आहे. हा 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.   

Web Title: Xiaomi to launch 120w fast charge smartphone in india soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.