गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुसांसह दाेघांना अटक, चाेरी, घरफाेडीच्या गुन्ह्यांचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 10:15 PM2021-09-24T22:15:38+5:302021-09-24T22:16:26+5:30

Crime News: गावठी पिस्टल, लायटर आणि चार जिवंत काडतुसे, कारसह दाेघांना अटक केल्याची घटना लातुरातील जुना रेणापूरनाका परिसरात शुक्रवारी सकाळी घडली.

pistol, four live cartridges arrested, burglary, burglary cases | गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुसांसह दाेघांना अटक, चाेरी, घरफाेडीच्या गुन्ह्यांचा उलगडा

गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुसांसह दाेघांना अटक, चाेरी, घरफाेडीच्या गुन्ह्यांचा उलगडा

Next

लातूर : गावठी पिस्टल, लायटर आणि चार जिवंत काडतुसे, कारसह दाेघांना अटक केल्याची घटना लातुरातील जुना रेणापूरनाका परिसरात शुक्रवारी सकाळी घडली. त्यांच्याकडून कारसह १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली आहे.  

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरात दाेघे विनापरवना गावठी पिस्टल बाळगत असून, ते जुना रेणापूरनाका येथून एमआयडीसी राेडने कारमधून येत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुभेदार रामजीनगरकडे जाणाऱ्या राेडच्या टी-पाॅइंटनजीक सापळा लावला. काही वेळाने ही कार (एम.एच. १७ ए.जी. ५५४७) जुना रेणापूर नाक्याकडून येत असताना आढळून आली. कारमधील दाेघांना पथकाने ताब्यात घेत चाैकशी करण्यात आली. त्याचबराेबर कारची झाडाझडती घेतली असता, यावेळी कारमधील डॅशबोर्डच्या कप्प्यात एक गावठी पिस्टल आणि त्यामधील मॅक्झिनमध्ये चार जिवंत काडतुसे, एक पिस्टलसारखे दिसणारे लायटर हाती लागले.

ताब्यात घेण्यात आलेल्या सद्दाम बडेसाब शेख (२०, रा. इंडियानगर, लातूर) आणि माेहम्मद खलील माेहम्मद हुसेन शेख (२८, रा. इंडियानगर, लातूर) यांना बाळगलेल्या पिस्टलबाबत अधिक विचारपूस केली असता, कसल्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगितले. याप्रकरणी दाेघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल, लायटर आणि चार जिवंत काडतुसे, कार असा मुद्देमाल पाेलीस पथकाने जप्त केला आहे. अधिक चाैकशीत चाेरी, घरफाेडीच्या गुन्ह्यांचाही उलगडा झाला आहे.

याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात पाेलीस अंमलदार माधव बिलापट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पाेलीस अंमलदार अंगद काेतवाड, राम गवारे, संपत फड, राजू मस्के, नितीन कठारे, जमीर शेख यांच्या पथकाने केली.

Web Title: pistol, four live cartridges arrested, burglary, burglary cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.