‘वास्तव’ हेच की तिला तिच्या योग्यतेचं ‘सिंहासन’ मिळालंच नाही !

By Admin | Published: May 18, 2017 06:42 PM2017-05-18T18:42:39+5:302017-05-18T22:09:06+5:30

अभिनेत्री रिमा लागूची अकाली एक्झिट चित्रपटजगताला आणि नाट्यसृष्टीला धक्का देणारी ठरली.

The reality is that she did not get the throne of her abilities! | ‘वास्तव’ हेच की तिला तिच्या योग्यतेचं ‘सिंहासन’ मिळालंच नाही !

‘वास्तव’ हेच की तिला तिच्या योग्यतेचं ‘सिंहासन’ मिळालंच नाही !

googlenewsNext

tyle="text-align: justify;">महेश मांजरेकर /लोकमत एक्सक्लुझिव्ह
अभिनेत्री रिमा लागूची अकाली एक्झिट चित्रपटजगताला आणि नाट्यसृष्टीला धक्का देणारी ठरली. तिच्या चाहत्यांसाठी चटका लावून गेली. वयाच्या साठीच्या उंबरठ्यावर या जगाचा निरोप घेतलेल्या रिमाविषयी अभिनेता-दिग्दर्शक आणि निर्माता महेश मांजरेकरने व्यक्त केलेलं हृद्य मनोगत...खास लोकमतसाठी...

रिमा लागू गेली. तिचं जाणं हे केवळ एका रंगकर्मीच्या अकाली एक्झिटपुरतं मर्यादित नाही. माझ्या कुटुंबातली एक व्यक्ती गमावल्याचं दु:ख आज मला झालं. नाटक-सिनेमातली माझी कारकीर्द आणि रिमाचं त्या भोवती असणं हा अतूट संबंध होता. तिच्या अकाली जाण्यानं तो धागा निखळला आहे. रिमाच्या या एक्झिटनंतर तिच्या योग्यतेचं, तिच्या माणूस म्हणून असलेल्या मोठेपणाचं मूल्यमापन होईल. त्यातून एक ठसठशीत निष्कर्ष निघणार आहे. ते वास्तव असं, की रिमाला तिच्या योग्यतेचं सिंहासन मिळालंच नाही !  ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू काळाच्या पडद्याआड )

माझ्या व्यावसायिक आयुष्याशी तिचा अतूट संबंध होता. मला कामाची आॅफर देणारी पहिली व्यक्ती तीच होती. १९८०च्या दशकाचा उत्तरार्ध हा आजच्यापेक्षा सर्वार्थाने वेगळा काळ होता. त्यावेळची नाटकं ही यंगस्टर्ससाठी नसायची. डॉ. लागूंसारखे दिग्गज नट डोळ्यांपुढे ठेवून त्यांच्यासाठी नाटकं लिहिली वा बसवली जायची. वाहिन्यांचं जाळंही नव्हतं. थोडक्यात सांगायचं तर रंगकर्मी उदंड आणि संधी मर्यादित असं व्यस्त गणित होतं. त्या काळात १९८७ साली मी ‘अफलातून’ हे नाटक केलं. यश किंवा स्थिरावण्याशी त्याचा काही संबंध नव्हता. पण त्याच सुमारास राजन ताम्हाणे मला येऊन भेटला. एका सीरियलमध्ये काम करशील का, अशी विचारणाही त्यानं केली. फक्त रिमानं माझ्या निवडीला होकार देण्याची गरज होती. कारण ती सीरियल राजन आणि रिमा मिळून दिग्दर्शित करणार होते. राजन मला त्यासाठी तिच्या घरी घेऊन गेला. तिनं हो म्हटलं आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. ते रिमा आणि माझं पहिलं एन्काऊंटर...पण ते स्वप्न वास्तवात आलं नाही. कारण पुढं त्या मालिकेचं दिग्दर्शन रिमा आणि राजननं केलं नाही. ते डॉ. सतीश राजमाचीकरांकडे गेलं आणि माझाही त्या सीरिअलमध्ये प्रवेश हुकला. 

(सलमान खानची ऑनस्क्रीन माँ रिमा लागू यांचं निधन)

(लेखक प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहेत )

 

 

Web Title: The reality is that she did not get the throne of her abilities!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.