फरहान अख्तरचा तुफान हा चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 04:17 PM2020-04-23T16:17:00+5:302020-04-23T16:20:02+5:30

फरहान अख्तरच्या तुफान या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

farhan akhtar toofan movie will release on 18 September 2020 PSC | फरहान अख्तरचा तुफान हा चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित

फरहान अख्तरचा तुफान हा चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित

googlenewsNext
ठळक मुद्देआरओएमपी पिक्चर्ससोबत एक्सेल एंटरटेनमेंट प्रोडक्शनचा तुफान राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित करत असून हा चित्रपट १८ सप्टेंबर 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता फरहान अख्तर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अभिनयासोबतच दिग्दर्शन, गायन व निर्मितीदेखील केली आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये त्याला यशदेखील मिळालं आहे. आता तो एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. यावेळेस तो बॉक्सिंग करताना दिसणार आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे तूफान. 

फरहान आपला आगामी चित्रपट तूफान सोबत बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्यास पूर्णपणे सज्ज झाला असून आपले अभिनय कौशल्य आणि बॉक्सिंगसोबत पुन्हा एकदा दर्शकांची मने जिंकणार आहे. 

फरहानने आजवर अनेक चित्रपटातील त्याच्या उल्लेखनीय भूमिकांसाठी अनेक पुरस्कार जिंकले असून त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले आहेत. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ मध्ये आपल्या काव्यात्म प्रतिभेचे दर्शन घडवत फरहानने साकारलेली जाहिरात क्षेत्रातील कॉपीराइटरची भूमिका दर्शकांच्या दीर्घकाळ लक्षात राहिली आहे. स्पोर्ट्स बायोपिक भाग मिल्खा भाग मध्ये, फरहान अख्तरने विश्व चॅम्पियन धावपटू मिल्खा सिंह यांची भूमिका साकारली होती. मोठ्या पडद्यावर त्यांनी साकारलेली ही व्यक्तिरेखा अतिशय प्रेरणादायक होती. 'द स्काई इज पिंक' चित्रपटात फरहान पती आणि पिता यांची गहन भूमिका साकारताना दिसला होता.  

फरहान आता तुफान सोबत बॉक्सिंग रिंग मध्ये पाय ठेवण्यास सज्ज झाला आहे. आरओएमपी पिक्चर्ससोबत एक्सेल एंटरटेनमेंट प्रोडक्शनचा तुफान राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित करत असून हा चित्रपट १८ सप्टेंबर 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: farhan akhtar toofan movie will release on 18 September 2020 PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.