अवैध गर्भपात केंद्रावर गुन्हे दाखल करण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:09 AM2017-12-01T01:09:20+5:302017-12-01T01:09:28+5:30

बीड बायपास रोडवरील आपत भालगाव येथे अवैधरीत्या गर्भपात केंद्र चालविणारी महिला व तिला औषधांचा पुरवठा करणाºया दोन औषध विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची सूचना अन्न व औषध प्रशासनाने पोलीस विभागाला केली आहे.

 Notice for filing of criminal cases at an abortion center | अवैध गर्भपात केंद्रावर गुन्हे दाखल करण्याची सूचना

अवैध गर्भपात केंद्रावर गुन्हे दाखल करण्याची सूचना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बीड बायपास रोडवरील आपत भालगाव येथे अवैधरीत्या गर्भपात केंद्र चालविणारी महिला व तिला औषधांचा पुरवठा करणाºया दोन औषध विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची सूचना अन्न व औषध प्रशासनाने पोलीस विभागाला केली आहे.
संबंधितांवर औषधी व सौंदर्यप्रसाधने कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्र औषध प्रशासनातर्फे पोलीस विभागाला देण्यात आले आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश केला. गर्भपात केंद्र चालविणारी ललिता मून ऊर्फ खांडे या महिलेला अटक करण्यात आली. गर्भपात केंद्र चालविण्यासाठी या महिलेला कोण कोण मदत करीत होते, याचा तपास आता पोलीस करीत आहेत. त्या महिलेने गर्भपातासाठी लागणारे वैद्यकीय साहित्य व औषधी समतानगर व गुलमंडी येथील औषध विक्रेत्यांकडून खरेदी केली असे सांगितल्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने औषधाचे स्लीप, सँपल आणि बॅच नंबर याची तपासणी केली होती.  

Web Title:  Notice for filing of criminal cases at an abortion center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.