सलमान खानच्या सांगण्यावरून कियारा आडवाणीने केले हे काम, तुम्हालाही वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 01:11 PM2019-05-10T13:11:02+5:302019-05-10T13:43:03+5:30

कियाराला खऱ्या अर्थाने लोकप्रियता एम एस धोनीः द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे मिळाली. कलंक या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात देखील कियारा एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. 

Salman Khan Suggested Kiara Advani Change Her Name. Because of Alia Bhatt | सलमान खानच्या सांगण्यावरून कियारा आडवाणीने केले हे काम, तुम्हालाही वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

सलमान खानच्या सांगण्यावरून कियारा आडवाणीने केले हे काम, तुम्हालाही वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

googlenewsNext
ठळक मुद्देमाझे खरे नाव आलिया आहे. पण आलिया भट ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असल्याने सलमान खानने मला नाव बदलण्याचे सुचवले. सलमानचे म्हणणे होते की, एकाच नावाच्या दोन अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असू शकत नाहीत.

कियारा आडवाणीने फग्ली या चित्रपटापासून तिच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर मशिन या चित्रपटात ती झळकली.  या दोन्ही चित्रपटामुळे तिला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. लस्ट स्टोरी या चित्रपटामुळे प्रेक्षकांनी तिची चांगलीच दखल घेतली. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता एम एस धोनीः द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे मिळाली. कलंक या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात देखील कियारा एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. 

कियाराने बॉलिवूडप्रमाणेच तेलगू चित्रपटात देखील काम केले आहे. या चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ती आता शाहिद कपूर सोबत कबीर सिंग या चित्रपटात झळकणार आहे. तसेच करिना कपूर आणि अक्षय कुमारच्या गुड न्यूजमध्ये देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधी अनेक अभिनेत्री आपल्या नावामध्ये बदल करतात असेच काहीसे कियाराने केले आहे. कियारा आडवाणीचे खरे नाव कियारा नसून आलिया असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे. तिने तिचे हे नाव इंडस्ट्रीत येण्यासाठी बदलले. पण तिने हे नाव बदलण्यामागे एक खास कारण आहे आणि विशेष म्हणजे हे नाव बदलण्यामागे बॉलिवूडमधील एक अभिनेता आणि अभिनेत्री आहे. नाव बदलण्यामागचे कारण तिने नुकतेच वुट वरील फिट अप विथ स्टार्स सिझन 2 मध्ये सांगितले आहे. 

कियारा सांगते, माझे खरे नाव आलिया आहे. पण आलिया भट ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असल्याने सलमान खानने मला नाव बदलण्याचे सुचवले. सलमानचे म्हणणे होते की, एकाच नावाच्या दोन अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असू शकत नाहीत. त्याने मला नाव बदलायला सुचवले असले तरी नवीन नाव काय ठेवायचे हे मी ठरवले. कियारा हे नाव मला आवडत असल्याने मी कियारा या नावाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. आता तर माझे आई-वडील देखील मला आलिया नव्हे तर कियारा या नावाने हाक मारू लागले आहेत.

Web Title: Salman Khan Suggested Kiara Advani Change Her Name. Because of Alia Bhatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.