ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन

By Admin | Published: January 6, 2017 09:15 AM2017-01-06T09:15:55+5:302017-01-06T12:00:16+5:30

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 66 वर्षांचे होते.

Veteran actor Om Puri dies | ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन

googlenewsNext
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी सकाळी निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. ओम पुरी यांच्या पत्नी नंदिता पुरी यांनी ओम पुरींच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. आपल्या अष्टपैलू अभिनयासाठी ओम पुरी ओळखले जायचे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसह चाहत्यांनाही धक्का बसला आहे. अर्धसत्य, मंडी, गांधी, स्पर्श, आक्रोश, भूमिका, घाशीराम कोतवाल अशा अनेक चित्रपट, नाटकांतील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.
 
(ओम पुरी यांना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली)
(तर भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक होईन - ओम पुरी)
(शहिदांचा अपमान केल्याप्रकरणी मी शिक्षेस पात्र - ओम पुरी)
 
१८ ऑक्टोबर १९५० साली हरियाणातील अंबाला येथे ओम यांचा जन्म झाला. त्यांनी पंजाबमधील पटियाला येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. १९७६ साली पुण्यातील एफटीआयआयमधील शिक्षणानंतर त्यांनी दीड वर्ष अभिनयाचे धडे दिले. त्यानंतर त्यांनी 'मजमा' हा स्वत:चा थिएटर ग्रुप स्थापन केला. १९९३ साली त्यांनी नंदिता पुरी यांच्याशी लग्न केले, मात्र २०१३ साली ते एकमेकांपासून विभक्त झाले. त्यांच्या पश्चात पत्नी नंदितासह इशान हा मुलगा आहे. 
 
समांतर सिनेमांपासून ते कमर्शिअल चित्रपटांपर्यंत लीलया अभिनय करत यश मिळवणा-या अभिनेत्यांमध्ये ओम पुरी यांचा समावेश होता. त्यांनी फक्त बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटात काम केले होते. ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी पुरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. सर्वसामान्य चेहरा असूनही आपल्या चोख अभिनयाच्या जोरावर ओम पुरी यांनी चित्रपटसृष्टीत आपले एक स्थान निर्माण केले. मध्यंतरीच्या काळात त्यांचे दारू पिण्याचे प्रमाणात वाढले होते, त्यामुळे त्यांची तब्येत ढासळली होती, असे मुराद म्हणाले. 
चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले. 
ओम पुरी यांचे सहकलाकार आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
 

Web Title: Veteran actor Om Puri dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.