सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन येतोय भारतात; Motorola करतेय Moto G200 5G Phone च्या लाँचची तयारी 

By सिद्धेश जाधव | Published: November 22, 2021 04:52 PM2021-11-22T16:52:41+5:302021-11-22T16:54:34+5:30

Motorola Moto G200 5G Price In India: Moto G200 5G Phone लवकरच भारतात Qualcomm Spandragon 888+ चिपसेट आणि 108MP Camera सह लाँच केला जाऊ शकतो. 

108mp camera phone motorola Moto G200 5G Phone launched with Snapdragon 888 plus  | सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन येतोय भारतात; Motorola करतेय Moto G200 5G Phone च्या लाँचची तयारी 

सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन येतोय भारतात; Motorola करतेय Moto G200 5G Phone च्या लाँचची तयारी 

Next

Motorola Moto G200 5G Price In India: Motorola ने गेल्या आठवड्यात युरोपियन मार्केटमध्ये एक दोन नव्हे तर 6 स्मार्टफोन्स सादर केले होते. परंतु या फोन्सच्या गर्दीत सर्वाधिक लक्ष Motorola Moto G200 5G Phone  ने वेधून घेतलं. कारण हा पॉवरफुल फ्लॅगशिप स्मार्टफोन कमी इतर फ्लॅगशिपच्या तुलनेत कमी किंमतीत सादर करण्यात आला होता. आता बातमी आली आहे कि Moto G200 लवकरच Qualcomm Spandragon 888+ चिपसेट आणि 108MP Camera सह भारतात लाँच केला जाऊ शकतो.  

टिपस्टर गॅजेट्सडेटाने ट्विटरवरून Moto G200 5G च्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. त्यानुसार हा फोन पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबर 2021 मध्ये भारतीय ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. हा फोन डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सादर केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. मोटोरोला इंडियाने मात्र या फोनची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.  

Moto G200 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स  

मोटोरोलाने हा स्मार्टफोन 6.8 इंचाच्या आयपीएस एलसीडी डिस्प्लेसह सादर केला आहे. हा पंच होत डिस्प्ले 144हर्ट्ज रिफ्रेश रेट, HDR10 आणि DCI-P3 colour gamut ला सपोर्ट करतो. वर सांगितल्याप्रमाणे यात ऑक्टकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 888+ चिपसेट देण्यात आला आहे. या अँड्रॉइड 11 ओएस असेलेल्या या फोनमध्ये  8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.   

फोटोग्राफीसाठी Moto G200 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे.  

Moto G200 5G Phone मध्ये IP52 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स मिळतो. तसेच सुरक्षेसाठी यात रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर मिळतो. यात 5G सह अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. पॉवर बॅकअपसाठी हा मोटोरोला फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.   

युरोपात या फोनची किंमत 450 युरो अर्थात अंदाजे 38,000 रुपये ठेवण्यात आली आहे. 

 

Web Title: 108mp camera phone motorola Moto G200 5G Phone launched with Snapdragon 888 plus 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.