Neelam Gorhe: राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री; पुणे महापालिकेवर भगवाचं फडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 06:23 PM2021-10-11T18:23:55+5:302021-10-11T18:24:02+5:30

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे महापालिकेवर भगवाचं फडकणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

Shiv Sena Chief Minister in the state so pune municipal corporation election win shiv sena | Neelam Gorhe: राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री; पुणे महापालिकेवर भगवाचं फडकणार

Neelam Gorhe: राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री; पुणे महापालिकेवर भगवाचं फडकणार

Next
ठळक मुद्देतमाम शिवसैनिकांनी उभे केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद

पुणे : राज्यात पुढील वर्षी महानगरपालिका निवडणूक (municipal corporation election in maharashtra)  होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यांमध्ये सर्व पक्षीय नेत्यांचे दौरे सुरु आहेत. कार्यकर्त्यांची साखळी मजबूत करण्याबरोबरच पक्षांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवले जात आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? याबाबत अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागले आहेत. पुण्यातही महापालिका निवडणुकीत आघाडी काय भूमिका घेणार. याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी पुणे महापालिकेवर भगवाचं फडकणार असा विश्वास व्यक्त केला आहे.  

गोऱ्हे म्हणाल्या, केंद्रात जरी सरकार आपल नसेल तरी राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहे. येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबई सोबत पुण्यात देखील भगवाच फडकेल. गेल्या दीड दोन वर्षांपासून राज्यातील सरकार नागरिकांना हिताचे काम करत असून. त्याच जोडीला तमाम शिवसैनिकांनी उभे केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

शिवसेना (shivsena) पुणे पर्वती मतदारसंघ विभाग प्रमुख अमोल रासकर यांच्यावतीने 'घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा' आयोजित केली होती.या प्रसंगी त्या बोलत होत्या. दुर्गामाता मंदिर, इंदिरा नगर, बिबवेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या या बक्षीस वितरण समारंभात  पर्वती मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, युवासैनिक, परिसरातील नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मनसे सहित विविध संघटनेच्या महिलांनी शिवसेनत प्रवेश केला.

Web Title: Shiv Sena Chief Minister in the state so pune municipal corporation election win shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.