श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकरने साजरी केली 1st Wedding Anniversary,बघा लग्नाचा अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 10:35 AM2017-12-04T10:35:19+5:302017-12-04T16:05:19+5:30

'मेड फॉर इच अदर' कपल श्रुती मराठे आणि  गौरव घाटणेकर गेल्या वर्षी 4 डिसेंबर 2016 ला  रेशीमगाठीत अडकले. त्यांच्या ...

Shruti Marathe and Gaurav Ghatanekar celebrated 1st wedding Anniversary, see the wedding album | श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकरने साजरी केली 1st Wedding Anniversary,बघा लग्नाचा अल्बम

श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकरने साजरी केली 1st Wedding Anniversary,बघा लग्नाचा अल्बम

googlenewsNext
'
;मेड फॉर इच अदर' कपल श्रुती मराठे आणि  गौरव घाटणेकर गेल्या वर्षी 4 डिसेंबर 2016 ला  रेशीमगाठीत अडकले. त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे.श्रृतीच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. तसेच श्रृती आणि गौरव सोबतचे अनेक झक्कास फोटो देखील कलाकारांनी शेअर केले होते. अभिजीत खांडकेकर, भार्गवी चिरमुले, अमृता खनविलकर, नेहा पेंडसे, संस्कृती बालगुडे, सोनाली खरे, हेमांगी कवी असे कितीतरी कलाकार श्रृती-गौरवच्या लग्नात धमाल करताना दिसले होते. नव वधुच्या वेषात सजलेली नवी नवरी श्रृती  लग्नात अतिशय सुंदर दिसत होती.दोघांची पहिली भेट लग्नाच्या 3 वर्षे अगोदर तुझी-माझी लव्ह स्टोरी या  सिनेमाच्या सेटवर  सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर दोघांनी रेशीमगाठीत अडकण्याचा निर्णय घेतला.
(Also  Read:Congratulation:शशांक केतकर दुस-यांदा अडकला विवाहबंधनात,समोर आले लग्नाचे INSIDE PHOTOS)



गेल्याच वर्षी भिनेत्री मृण्मयी देशपांडे लग्नाच्या बेडीत अडकली.व्यवसायिक स्वप्नील रावसह तिचे शुभमंगल पार पडले. एक डिसेंबरला मोठ्या उत्साहात पार पडलेल्या सोहळ्यात पल्लवी आणि संग्राम लग्नबंधनात अडकले. चिराग आणि सना अंकोला दोघेही गेल्याच वर्षी रेशीमगाठीत अडकले होते.2016 या वर्षाच्या अखेरच्या महिन्यात या सेलिब्रिटींनी नव्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केल्याचे पाहायला मिळाले.





सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सनई चौघड्यांचे मंगलमय सुर घुमु लागले आहेत.कारण एका पाठोपाठ एक असे अनेक कलाकार या महिन्यात विवाहबदध झाले आहेत. मेहंदी. संगीत, हळद ते लग्नाच्या मंडपातील या नव विवाहीत जोडप्यांचे सर्वच फोटो सध्या चर्चेचा विषय झाले आहेत. नुकतेच अभिनेत्री प्रार्थना बेहरे दिग्दर्शक अभिषेक जावकरसह रेशीमगाठीत अडकली.तर तिच्या पाठोपाठ अभिनेता विजय आंदळकर नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.अभिनेत्री पुजा पुरंदरे हिच्याशी गुरूवारी तो रेशीमगाठीत अडकला.आता यांच्या अभिनेता शशांक केतकरही प्रियांका ढवळेसोबत विवाहबंधनात अडकला आहे. आता लवकरच 'रेगे' फेम अभिनेता आरोह वेलणकर मैत्रिण अंकिता शिंगवीसह येत्या 11 डिसेंबरला रेशीमगाठीत अडकणार आहे. सोशल साईट्सवर सगळीकडेच लग्नाचा धुमधडाका पहायला मिळत आहे.आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारे मराठी मनोरंजन दुनियेतील अभिनेता आणि अभिनेत्री रेशीमगाठीत अडकले आहेत.कुणी आपला जोडीदार स्वतः निवडत लव्ह मॅरेज करणे पसंत केले आहे. तर काहींनी आपल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या पसंतीला सकारात्मक होकार देत लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.

Web Title: Shruti Marathe and Gaurav Ghatanekar celebrated 1st wedding Anniversary, see the wedding album

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.