LIC IPO Launch Date: काही झाले तरी LIC IPO ३१ मार्चपूर्वीच आणावा लागणार; मोदी सरकार 'अगतिक'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 01:19 PM2022-01-28T13:19:43+5:302022-01-28T13:25:45+5:30

LIC IPO Launch Date: देशाचा अर्थसंकल्प चार दिवसांवर आला तरी गेल्या अर्थसंकल्पात घोषणा केलेला एलआयसीचा आयपीओ सरकारला आणता आलेला नाही.

देशातील सर्वात मोठी कंपनी एलआयसी (LIC)चा आयपीओ कधी येणार याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण जो एलआयसीचा पॉलिसीधारक आहे त्याला देखील शेअर घेता येणार आहेत. यामुळे मोदी सरकारवरील दबाव वाढला आहे.

देशाचा अर्थसंकल्प चार दिवसांवर आला तरी गेल्या अर्थसंकल्पात घोषणा केलेला एलआयसीचा आयपीओ सरकारला आणता आलेला नाही. यामुळे सरकारने यावर एलआयसीचा आयपीओ कधी येणार हे सांगितले आहे.

सरकारने स्पष्ट केले की, एलआयसीचा आयपीओ मार्चच्या अखेरीस येणार आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यार्यंत आयपीओ शेअर बाजारात लिस्ट केला जाणार आहे.

LIC च्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) संबंधी मसुदा कागदपत्रे तयार केली जात आहेत आणि लवकरच बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे सादर केली जातील.

एलआयसीचा आयपीओ यंदा येणार की नाही याबाबत बाजारात अफवा आहेत. एलआयसीच्या संपत्तीचीच मोजदाद झाली नसल्याने आयपीओ आणण्यास उशिर होईल असे सांगितले जात आहे. यामुळे वेळोवेळी सरकारला यावर स्पष्टीकरण, खुलासे द्यावे लागत आहेत.

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) चे सचिव तुहिन कांत पांडे म्हणाले की, "एलआयसीच्या निर्गुंतवणुकीची रक्कम या वर्षीच्या बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. यामुळे आम्हाला आयपीओ याच वर्षी आणावा लागणार आहे. ३१ मार्चपुर्वी आयपीओ लिस्ट करणार आहोत."

सरकारचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी LIC चा IPO खूप महत्वाचा आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात निर्गुंतवणुकीचे लक्ष्य 1.75 लाख कोटी रुपये आहे.

गेल्या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून 32,835 कोटी रुपये उभे करण्यात आले. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत PSUs मधील अल्पसंख्याक स्टेक विकून 9,330 कोटी रुपये उभे केले आहेत.