उद्यापासून मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 12:57 PM2021-09-25T12:57:40+5:302021-09-25T12:58:06+5:30

भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होईल. त्यानंतर पुढील २४ तासांत ते ओडिशा किनाऱ्याजवळ सरकेल.

The intensity of rain will increase from tomorrow | उद्यापासून मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर वाढणार

उद्यापासून मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर वाढणार

googlenewsNext

मुंबई: मुंबईसहमहाराष्ट्रात आता पावसाने विश्रांती घेतली असली तरीदेखील पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आता रविवारपासून पुन्हा एकदा मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर वाढणार आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होईल. त्यानंतर पुढील २४ तासांत ते ओडिशा किनाऱ्याजवळ सरकेल. परिणामी, याचा प्रभाव म्हणून राज्यात पुढील चार ते पाच दिवस गडगडाटासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषत: रविवारपासून पावसाचा जोर वाढेल. यंदा मान्सूनच्या परतीच्या प्रवासालाही विलंब झाला आहे. 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचा प्रभाव आणखी वाढणार असून उत्तर आणि उत्तर - पश्चिम दिशेने ते पुढे सरकणार आहे. परिणामी, रविवारपासून महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. याचा प्रभाव विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावर राहील. कोकण, विशेषत: मुंबईवर देखील याचा प्रभाव जाणवेल.
- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग
 

Read in English

Web Title: The intensity of rain will increase from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.