तयारीला लागा! ६३ टक्के कंपन्यांमध्ये सुरू होणार भरती, ५१ टक्के नोकऱ्या वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 09:07 AM2022-06-17T09:07:52+5:302022-06-17T09:08:11+5:30

भारतीय कंपन्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.

Get ready Recruitment will start in 63 percent companies jobs will increase by 51 percent | तयारीला लागा! ६३ टक्के कंपन्यांमध्ये सुरू होणार भरती, ५१ टक्के नोकऱ्या वाढणार

तयारीला लागा! ६३ टक्के कंपन्यांमध्ये सुरू होणार भरती, ५१ टक्के नोकऱ्या वाढणार

Next

नवी दिल्ली :

भारतात कोरोनामुळे गेल्या काही वर्षांत कोट्यवधी तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र, आता अर्थचक्र रुळावर आले असून, कंपन्यांकडून भरती वाढल्याने बेरोजगारी कमी होत असल्याचे सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. याच दरम्यान एका सर्वेक्षणानुसार, भारतीय कंपन्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.

मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आउटलूक सर्वेक्षणात हा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, सप्टेंबर तिमाहीमध्ये रोजगारांमध्ये तब्बल ५१ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. हे प्रमाण वर्ष २०१४ नंतर सर्वाधिक असेल. सर्वेक्षणानुसार, उद्योगांचे अर्थचक्र सध्या वेगवान झाले असून, सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपन्यांना ६३ टक्के अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे कंपन्यांना वेगाने भरती करावी लागणार आहे. असे असले तरीही या दरम्यान १२ टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहेत.

देशामध्ये नोकरी मिळण्याचे प्रमाण वाढले
1. वाढती महागाई आणि जागतिक स्तरावर अस्थिरता वाढत असतानाही देशातील अनेक क्षेत्र पुन्हा जोमाने उभी राहू पाहत आहेत. मॅनपॉवर ग्रुपच्या सर्वेक्षणामध्ये तीन कंपन्यांचा समावेश होता. 
2. अहवालानुसार, सप्टेंबर तिमाहीमध्ये भरती वाढण्याचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलेनत ४६ टक्क्यांनी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

आयटी क्षेत्रात सर्वाधिक संधी 
डिजिटायझेशन, ॲटोमेशन आणि टेक प्रोफेशनल्स यांची मागणी वाढत आहे. या कारणामुळे सर्वांत जास्त मागणी डिजिटलमध्ये येणार आहे. आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे.

या क्षेत्रांत नोकऱ्या वाढणार 
आयटी-टेक ७२%
बँकिंग-फायनान्स ६०%
विमा-बांधकाम क्षेत्र ६०%
अन्य सेवा ५२%
रेस्टॉरंट-हॉटेल ४८%
उत्पादन क्षेत्र ४८%

नोकरीची परिस्थिती
६३% भरती 
२५% बदल नाही

कोणत्या देशात किती वाढणार नोकऱ्या? 
५१% भारत 
४०% सिंगापूर 
३८% ॲास्ट्रेलिया 
११% हाँगकाँग 
०४% जपान
०३% तैवान 

४६%  नोकऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता २०२१-२२ सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत

१३%  अधिक नोकऱ्यांची शक्यता जून तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीमध्ये 
आशिया पॅसिफिकमध्ये नोकरीसाठी सध्या  भारत सर्वोत्तम

Web Title: Get ready Recruitment will start in 63 percent companies jobs will increase by 51 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.