UPSC Recult: बापाच्या कष्टाचं चीज झालं; शेतकऱ्याच्या मुलाची बाजी, पंढरपूरमधील शुभमला UPSCत घवघवीत यश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 10:53 AM2021-09-25T10:53:56+5:302021-09-25T11:01:05+5:30

राज्यातील पंढरपूरमधील माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी गावातील पांडुरंग जाधव या शेतकऱ्याचा मुलगा शुभम याने देशात ४४५ वे स्थान मिळवले आहे.

UPSC Recult: Farmer's son Shubham Jadhav from Pandharpur succeeds in UPSC | UPSC Recult: बापाच्या कष्टाचं चीज झालं; शेतकऱ्याच्या मुलाची बाजी, पंढरपूरमधील शुभमला UPSCत घवघवीत यश

UPSC Recult: बापाच्या कष्टाचं चीज झालं; शेतकऱ्याच्या मुलाची बाजी, पंढरपूरमधील शुभमला UPSCत घवघवीत यश

googlenewsNext

यूपीएससीच्या लोकसेवा परीक्षा २०२० चा निकाल जाहीर झाला आहे. एकूण ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या पहिल्या २५ जणांमध्ये १३ विद्यार्थी आणि १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर एकूण उत्तीर्ण उमेदवारांमधील विद्यार्थ्यांची संख्या ५४५, तर विद्यार्थिनींची संख्या २१६ इतकी आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

राज्यातील पंढरपूरमधील माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी गावातील पांडुरंग जाधव या शेतकऱ्याचा मुलगा शुभम याने देशात ४४५ वे स्थान मिळवले आहे. प्राथमिक शिक्षण शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केल्यावर त्याने माध्यमिक शिक्षण माळीनगर येथे पूर्ण केले. यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मधून बी ए इकॉनॉमिक्स मधून पदवी घेतल्यावर ज्ञान प्रबोधिनी आणि युनिक क्लासेस मधून केंद्रीय लोकशाही आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. 

ढूंढते रह जाओगे! 'या' फोटोतील लपलेला उंट शोधून दाखवा; बघा तुम्हाला जमतंय का!

अधिकारी होण्याची जिद्द मनात ठेवत अभ्यास सुरू केला. सलग चार वेळा मुलाखतीपर्यंत जाऊनही शुभम याची निवड झाली नाही. यावेळी मात्र त्याने देशात ४४५ स्थान पटकावत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. शुभम हा इतर मागास प्रवर्ग मधून येत असल्याने यावेळी त्याला IPS मिळण्याची शक्यता आहे. तरीही पुढच्या वर्षी अजून जोमाने तयारी करून आयएएस होण्याची शुभम याची जिद्द आहे. 

वाघोली येथील एका शेतकऱ्याचा मुलगा सागर भारत मिसाळ याने देखील ३५४ क्रमांकाने पास होऊन यश संपादन केले आहे. यापूर्वी सागर मिसाळ यांनी २०२० मध्येही २०४ क्रमांकाने यश मिळवून उत्तराखंड या राज्यात आयएएस पदावर त्यांची निवड झाली होती. जिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न मनी बाळगून दुसऱ्यांदा प्रयत्न केले. त्यात त्यांनी यश प्राप्त केले आहे. हा दुसरा प्रयत्न केला होता त्यातही यश प्राप्त केले.

दरम्यान, केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी २०२० मध्ये परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे मुलाखती घेण्यास यावर्षी उशीरा झाला. लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यावर्षीच्या फेब्रुवारी ते जुलै या महिन्यात मुलाखत घेण्यात आली. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण ७६१ उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. 

Web Title: UPSC Recult: Farmer's son Shubham Jadhav from Pandharpur succeeds in UPSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.