‘निसर्ग’ने सलमान खानच्या फार्म हाऊसचेही केले नुकसान; पाहा युलियाने शेअर केलेले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 05:30 PM2020-06-05T17:30:49+5:302020-06-05T17:31:47+5:30

होय, वादळामुळे सलमानच्या या फार्महाऊसचेही नुकसान झाले. हे नुकसान आपण फोटोत पाहू शकतो.

Cyclone Nisarga effect: Iulia Vantur shares photos and video of Salman Khan's farmhouse | ‘निसर्ग’ने सलमान खानच्या फार्म हाऊसचेही केले नुकसान; पाहा युलियाने शेअर केलेले फोटो

‘निसर्ग’ने सलमान खानच्या फार्म हाऊसचेही केले नुकसान; पाहा युलियाने शेअर केलेले फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे सलमानचा ‘राधे’ हा सिनेमा खोळंबला आहे. हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही.

अलीकडे महाराष्ट्राच्या अनेक भागांना निगर्स चक्रीवादळाचा फटका बसला. मुंबई, पुणे, रायगडसह पुण्यातील काही भागांत या चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले. अनेक भागात झाडं उन्मळून पडली. वीजप्रवाह खंडित झाला. मुसळधार पावसाने अनेक भागांना झोडपून काढले. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या पनवेल येथील फार्महाऊसलाही या चक्रीवादळाचा फटका बसला. होय, वादळामुळे सलमानच्या या फार्महाऊसचेही नुकसान झाले.
हे नुकसान आपण फोटोत पाहू शकतो. वादळापूर्वी आणि वादळानंतर फार्महाऊसची काय अवस्था झाली, ते या फोटोत दिसत आहे.

सलमानने नाही पण त्याची  कथित गर्लफ्रेन्ड युलिया वंतूर हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत.
 यात तिने वादळ येण्याची आधीचे आणि नंतरचे दोन्ही फोटो पोस्ट केले आहेत.

युलियानं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये या वादळाने सलमानच्या फार्महाऊसचं कशाप्रकारे नुकसान केले हे पाहायला मिळत आहे. फार्म हाऊसच्या परिसरात अनेक ठिकाणी मोठी मोठी झाडं वादळामुळे उन्मळून पडल्याचे पाहायला मिळत आहे.

निगर्स चक्रीवादळादरम्यान मुसळधार पावसाचा फोटो तिने शेअर केला आहे. शिवाय फार्महाऊसवर विंचू आढळल्याचे सांगत त्याचाही एक फोटो तिने शेअर केला आहे.

लॉकडाऊनच्या संपूर्ण काळात सलमान याच फार्महाऊसवर अडकून पडला होता. आत्ताही सलमान फार्म हाऊसवरच असल्याचे कळतेय.
 त्याच्यासोबत युलिया आणि जॅकलिन फर्नांडिस या दोघीही फार्म हाऊसवर आहेत. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यावर सलमान आपल्या वडिलांना भेटून पुन्हा फार्म हाऊसवर परतला होता.



 काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यावर सलमान आपल्या वडिलांना भेटून पुन्हा फार्म हाऊसवर परतला होता.
लॉकडाऊनमुळे सलमानचा ‘राधे’ हा सिनेमा खोळंबला आहे. हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. मात्र लॉकडाऊनच्या  लॉकडाऊनच्या काळात त्याची दोन गाणी आणि म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला आहे.

Web Title: Cyclone Nisarga effect: Iulia Vantur shares photos and video of Salman Khan's farmhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.