ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे कामगार चौकात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:22 PM2019-07-29T23:22:04+5:302019-07-29T23:22:56+5:30

औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे सोमवारी कामगार चौकात आंदोलन करण्यात आले.

Transport Association agitates in truck terminal | ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे कामगार चौकात आंदोलन

ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे कामगार चौकात आंदोलन

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी कामगार चौकातलगत असलेल्या वाहनतळातील विविध समस्यांसंदर्भात औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे सोमवारी कामगार चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकांनी एमआयडीसीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

वाळूज एमआयडीसतील ये-जा करणाऱ्या जड वाहनांसाठी येथील कामगार चौकातलगत वाहनतळ उभारण्यात आले आहे. प्रशासनाकडून वेळेवर देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याने वाहनतळाची दुरावस्था झाली आहे. सांडपाण्याची व्यवस्था केली नसल्याने वाहनतळासह रस्त्यावर पाणी साचत असून, याचा लगतच्या ट्रान्सपोर्ट चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांची गैरसोयीचा होत आहे. खड्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. या भागातील पथदिवेही अनेक दिवसापासून बंद आहेत. अंधारामुळे या भागात चोरीच्या घटना घडत असून, व्यवसायिकांमध्ये चोरट्यांची दहशत पसरली आहे.

या संदर्भात वारंवार मागणी करुनही याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केला आहे. येथील प्रश्न निकाली काढावेत या मागणीसाठी सोमवारी औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने कामगार चौकालगत आंदोलन करुन याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

आंदोलनात असोसिएशनचे सरचिटणीस आर.के. सिंग, उपाध्यक्ष राजेंद्र माहेश्वरी, संतोष वानखेडे, सुरेश पहाडे, मेघा यादव, सय्यद कलीम, राजू घोडे, मोहम्मद अन्सारी, राजू काटकडे, सुमित पाटील, चिन्मयानंद कुलकर्णी, नरेंद्र शुक्ला दौलतसिंग नेगी,एन के तिवारी, आदींची उपस्थिती होती.

Web Title: Transport Association agitates in truck terminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Walujवाळूज