अन् गंगेत बुडता बुडता वाचली हॉलिवूड अभिनेत्री टॅमी बार्टिया!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 07:52 PM2018-07-29T19:52:10+5:302018-07-29T19:53:51+5:30

काशीत गंगास्नान करण्यासाठी गेलेली एक हॉलिवूड अभिनेत्री बुडता बुडता वाचली. होय, वाराणसीत अतुल गर्गच्या ‘द लीजेंड आॅफ पीकॉक’ या चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. या चित्रपटाच्या शूटींगसाठी हॉलिवूड अभिनेत्री टेमी बार्टिया सध्या वाराणसीत आहे.

hollywood actress tammy bartaia survived sinking in the ganges | अन् गंगेत बुडता बुडता वाचली हॉलिवूड अभिनेत्री टॅमी बार्टिया!

अन् गंगेत बुडता बुडता वाचली हॉलिवूड अभिनेत्री टॅमी बार्टिया!

googlenewsNext

काशीत गंगास्नान करण्यासाठी गेलेली एक हॉलिवूड अभिनेत्री बुडता बुडता वाचली. होय, वाराणसीत अतुल गर्गच्या ‘द लीजेंड आॅफ पीकॉक’ या चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. या चित्रपटाच्या शूटींगसाठी हॉलिवूड अभिनेत्री टॅमी  बार्टिया सध्या वाराणसीत आहे. चित्रपटाचा एक सीन गंगा नदीत चित्रीत केला जाणार होता, चित्रपटाचा दिग्दर्शक, कॅमेरामॅन आणि संपूर्ण टीम तयारीला लागली आणि सीनचे शूट सुरु झाले. सगळे या शूटमध्ये असे काही गुंतले की,  टॅमी  बुडतेय हे कुणाच्याच लक्षात आले नाही. यादरम्यान दिग्दर्शक अतुल गर्ग यांना संकटाची चाहूल लागली,  टॅमी  पाण्यात सीन देत नसून बुडत असल्याचे त्यांना जाणवले, त्यांनी लगेच टीमला कामाला लावले आणि  टॅमीला पाण्यातून बाहेर काढले गेले. अतुल गर्ग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. माझ्या अस्टिस्टंटने प्रसंगावधान दाखवले आणि एक मोठी दुर्घटना टळली़ मी सगळे श्रेय त्याला देईल, असे ते म्हणाले.
दिग्दर्शक अतुल गर्ग ‘द लीजेंड आॅफ पीकॉक’ या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. वाराणसीत बॉलिवूड व हॉलिवूड कलाकारांसोबत या चित्रपटाचे ४५ टक्के शूटींग झाले आहे. उर्वरित शूटींग अमेरिकेत होणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. हिंग्लिश भाषेतील या चित्रपटात हॉलिवूड अभिनेत्री टॅमीशिवाय अभिनेत्री असिमा शर्मा, मनीष वाधवा आणि अब्बास खान यांच्या प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात वाराणसीचे काही स्थानिक कलाकारही दिसणार आहे.

Web Title: hollywood actress tammy bartaia survived sinking in the ganges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.