'पुष्पा' चित्रपटातील स्टेपची नक्कल करत मुंबई लोकलमध्ये मिळवली सीट! धमाल Video व्हायरल, एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 07:22 PM2022-01-17T19:22:21+5:302022-01-17T19:23:14+5:30

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा- द राइज (Pushpa: The Rise) चित्रपटाचा जोरदार बोलबाला सुरू आहे.

pushpa allu arjun srivalli hook step mumbai local train hilarious video viral instagram | 'पुष्पा' चित्रपटातील स्टेपची नक्कल करत मुंबई लोकलमध्ये मिळवली सीट! धमाल Video व्हायरल, एकदा पाहाच...

'पुष्पा' चित्रपटातील स्टेपची नक्कल करत मुंबई लोकलमध्ये मिळवली सीट! धमाल Video व्हायरल, एकदा पाहाच...

googlenewsNext

मुंबई-

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा- द राइज (Pushpa: The Rise) चित्रपटाचा जोरदार बोलबाला सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर धमाका केलेल्या 'पुष्पा' चित्रपटातील काही हटके स्टेप्सची हुबेहुब नक्कल करण्याचीही क्रेझ तरुणाईमध्ये पाहायला मिळत आहे. विशेषत: श्रीवल्ली गाण्यातील हूक स्टेपनं (Srivalli Hook Step) सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

सोशल मीडियात श्रीवल्ली गाण्याची हूक स्टेप खूप व्हायरल झाली आहे. पण त्यातही मुंबई लोकलमधील गर्दीचं आणि प्रवाशांचं उदाहरण देत एका नेटिझननं श्रीवल्ली गाण्यातील हूक स्टेपचं एक विनोदी व्हर्जन इंस्टाग्रामवर पोस्ट केलं आहे. या व्हिडिओची जोरदार चर्चा सोशल मीडियात सुरू आहे. धीरज सनम नावाच्या युझरनं तयार केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत १ लाख ७६ हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 'Pushpa In Locals', असं कॅप्शन धीरजनं त्याच्या व्हिडिओ दिलं आहे. मुंबईची लोकल म्हटलं की गर्दी आलीच. या गर्दीत पाठीवरील बॅग पोटावर घेण्याची मुंबईकरांची सवय देखील सर्वश्रृत आहे. तसंच लोकलमध्ये सीट पकडण्याची धडपड तर सांगायलाच नको. अशात बॅग पोटावर घेतल्यानंतर एका प्रवाशाकडून दुसऱ्या प्रवाशाला होणारी अडचण यात दाखवण्यात आली आहे. श्रीवल्ली गाण्यात अल्लू अर्जुननं केलेली हूक स्टेप जशीच्या तशी कॉपी करुन धीरजनं मुंबई लोकलमध्येही बॅग पोटावर घेऊन तसाच प्रवास केला आहे. 

पाहा व्हिडिओ-

Web Title: pushpa allu arjun srivalli hook step mumbai local train hilarious video viral instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.